जळगाव : आज अयोध्येत श्रीरामाचे मंदिराचे मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे रामाचे मंदिर उभारण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा. अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन तेलंगनाचे आमदार व श्रीराम सेनेचे संस्थापक टी.राजासिंह यांनी केले.हिंदू जनजागृती समितीच्यावतीने रविवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी शिवतीर्थ मैदानावर आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर हे उपस्थित होते. सभेला प्रचंड गर्दी होती. आमदार राजासिंह म्हणाले की, चित्रपट अभिनेता नसीरुद्दीन शहा, आमिरखान, शाहरूख खान यांना याच देशात राहून, कोट्याधीश झाल्यानंतर आता असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे यापुढे त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करून बघू नका.आठ दिवस वाट बघा, इंटरनेटवर फुकटात बघा, असे आवाहन केले. देशात अल्पसंख्य नव्हे, तर बहुसंख्य हिंदू धोक्यात आहेत. देशात गोहत्या वाढली असून मोठ्या प्रमाणावर गोमांस निर्यात केले जात आहे. हिंदूंचे उत्सव, सण आल्यावर ध्वनीक्षेपकावर बंदी आणली जाते असा सवालही त्यांनी केला.१६ रोजी बैठकहिंदू राष्टÑ स्थापनेची दिशा ठरविण्यासाठी १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगावातील पद्मावती मंगल कार्यालयात बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली.
राम मंदिरासाठी अध्यादेश काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:19 AM
आमदार टी. राजासिंह यांचे आवाहन
ठळक मुद्दे हिंदू राष्ट्र जागृती सभेला प्रचंड प्रतिसाद