शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

लागला टकळा पंढरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:04 AM

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था अशा सर्व अंगांनी आपली जगण्याची शैली बदलणार आहे. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातल्या बदलाचा एक झटका बसला तो आपल्या वर्षानुवर्षाच्या वारकरी परंपरेच्या श्रीक्षेत्र पंढरपूर वारीला. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेवर चालणारा भाविक समाज आज अगतिक होऊन घरी बसला आहे.जावे पंढरीसी आवडी मनासी । कई एकादशी आषाढी हे । अशा आर्त भावाने पंढरीचा टकळा लागलेला पांडुरंगाचा भक्त निराश, उदास अवस्थेत त्या पांडुरंगालाच हे संकट निवारण्यासाठी साकडे घालतो आहे. मोजक्या संख्येने वारीला, कथा, कीर्तनाला परवानगी द्यावी म्हणून शासनाला विनवण्या करतो आहे. हेही दिवस जातील, संकटदेखील निवारण होईल. मळभ दूर होईल. आकाश मोकळे होईल. अंधाराचे जाळे फिटलेले असेल. त्या बदललेल्या काळात या संपूर्ण व्यवस्थेची पुनर्मांडणी करावी लागणार आहे. गेल्या काही वर्षातील वारीचे दिवस आठवा.पंढरपूरला जमलेला माणसांचा महासागर! प्रवासात होणारे अपघात, बळींची आकडे इ. इ. अलिकडे वारी हा ‘इव्हेंट’ होऊन गेला होता. वारीच नव्हे तर विवाह, वाढदिवसापासून मृत्यूपर्यंत तुमच्या-माझ्या घरातल्या कौटुंबिक कार्यक्रमापासून ते मंत्र्यांच्या शपथविधीपासून-सत्संगापर्यंत सर्वच सार्वजनिक कार्यक्रम गर्दी जमवून, गाजावाजा करत भव्यदिव्यतेबाबत स्पर्धा करत साजरे करण्याची फॅशन बनली होती. अगदी कोरोनाचे काही तासांचे लॉकडाऊनही आम्ही टाळ्या, थाळ्या नि फटाके वाजवून साजरे केले, यातच सर्व काही आले.न्यायमूर्ती वासकर यांनी फडपरंपरेच्या पायी वारीची आठवण सांगताना एकदा असे म्हटले होते की, ‘आमच्या बालपणी मोठ्यांच्या खांद्यावर बसून पाहिले तरी माऊलींच्या पालखीतील दिंड्यांचे पहिले आणि शेवटचे टोक सहज दिसत असे! काळासोबत वारी वाढली पण ‘भक्ती’ कमी झाली. इव्हेंट अधिक झाला.गर्दी वाढली गुणवत्ता कमी झाली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला आलेले हे महत्व चिंताजनक आहे. आज कोरोनाच्या निमित्ताने का होईना; पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ होऊ लागले आणि पाच पंचवीस भाऊबंद एखादा मृताला अखेरचा निरोप देऊ लागले आहेत. पायवारीने प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यापेक्षा मानसवारी करुन दर्शनाचे पुण्य पदरी पाडूया. अनावश्यक आणि अतिरिक्त गर्दी करुन पर्यावरणाचे प्रश्न बिकट करण्यापेक्षा घरी राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांच्या संपर्कात राहूया. पांडुरंगाचे दर्शनही मला आॅनलाईन घेता येईल. जवळून घेता येईल. वारंवार घेता येईल. तिथे जाऊनच माझी भक्ती सिद्ध होईल, असे थोडेच आहे? अश्या मानसवारीसाठी सर्वांना रामकृष्ण हरी!!!-प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव