आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १२ -२२ जिल्ह्यातील सवोत्कृष्ठ आरोग्य सेवा पुरविणाऱ्या आशा सेविका, गट प्रवर्तक, आरोग्य सेवक - सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रांना बुधवारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ यात डॉ. आनंदीबाई जोशी उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार हा चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आला आहे़हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी जि.प. च्या शाहू महाराज सभागृहात झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आरोग्य सभापती दिलीप पाटील, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, सदस्य रवींद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़जिल्हास्तरीय प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुरस्कार तळेगाव प्रा़ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ़ प्रमोद सोनवणे, डॉ़ आशा राजपूत व कर्मचाºयांना प्रदाण करण्यात आला़ यात पाच हजार रुपये रोख सन्मानचिंन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हास्तरीय सर्वोकृष्ठ आशा पुरस्कारात प्रथम विजया रतनसिंग जाधव, द्वितीय तमीजा युनुस तडवी यांना तर जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पुरस्कार प्रथम संगीता दीपक माळी, द्वितीय ज्योती रत्नाकर चव्हाण, तृतीय वनिता प्रविण बारी यांना देण्यात आला.फ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कारफ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कारात आरोग्य सेविकांमधून प्रथम विनयश्री पांडूरंग जाधव, द्वितीय शोभा शिवदास घाटे, तृतीय वैशाली तुकाराम खंडारे यांना प्रदाण करण्यात आला. तर फ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कारात आरोग्य सहायिकांमध्ये प्रथम राजश्री तुळशीराम पाटील, द्वितीय अरुणा गोविंद कोलते, तृतीय ललिता रमेशसिंग परदेशी, तृतीय पुष्पा रवींद्र शिनकर आणि फ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कार जी़ एऩ एम.मध्ये प्रथम कोमल राजेश आदिवाले, द्वितीय मंगल सुनील धमके, तृतीय जयश्री विष्णू वानखेडे यांना देण्यात आला आहे़
तळेगाव आरोग्य केंद्रास उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:09 PM
उत्कृष्ठ आरोग्य सेवा पुरस्कारांचे वितरण
ठळक मुद्देसोहळाफ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कार