लोकमत न्यूज नेटवर्करावेर : तालुका होमगार्ड कार्यालयात सेवारत असताना तालुका होमगार्ड समादेशक व अंशकालीन लिपिक यांनी 2015 मध्ये जून, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात साप्ताहिक परेडमध्ये गैरहजर असलेल्या जवानाची व एकाची जादा हजेरी दाखवली. तसेच दोन जवानांचे शिल्लक बिल बनवून आणि खोटी व बनावट बिलपत्रके तयार करून व खोटय़ा स्वाक्षरी करून शासनाची फसवणूक करीत 360 रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, तालुका होमगार्ड या शासकीय कार्यालयात सेवारत असताना तालुका समादेशक आरोपी एकनाथ जगन्नाथ महाजन, व अंशकालीन लिपिक केशव रामभाऊ महाजन यांनी स्वत:च्या फायद्यासाठी जून, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एक होमगार्ड साप्ताहिक परेडला गैरहजर असताना व दुस:याची जादा हजेरी दाखवून तर दोन होमगार्डच्या नावे शिल्लक खोटी व बनावट बिले तयार केली, तसेच खोटय़ा स्वाक्षरी करून 90 रुपये साप्ताहिक परेड भत्त्याप्रमाणे 360 रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठेवत जिल्हा होमगार्ड समादेशक सुभाष शिवाजी अस्वार यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम 408, 420, 465, 468, 471, 477(अ) व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दीपक ढोमणे करीत आहेत.
तालुका समादेशक व अंशकालीन कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: May 19, 2017 1:18 AM