कार्यक्रमाला गर्दी जमल्याचे पाहून त्यांना हायसे वाटले आणि या गर्दीला पाहूनच त्यांनी फैजपूरमधून स्वबळाची घोषणा करून टाकली. असाच दौरा
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे प्रभारी अविनाश आदिक यांनी केला. बहुतेक ठिकाणी गर्दी झाली. त्यांनी स्वबळाची भाषा वापरली नाही पण पक्षाचे किती सेल कार्यरत आहेत यावर भर देत स्थानिक नेत्यांना चांगलेच अडचणीत आणले म्हणता. आता साधारण पक्षाची बैठक आटोपली की आलेल्या नेत्यांसोबत फोटो काढायचा, निवेदन द्यायचे, चर्चा करायची आणि गळ्यातील गमछा सहज काढून फेकून द्यायचा हे नित्याचेच झाले आहे. राष्ट्रवादीच्या अमळनेर येथील बैठकीनंतरही नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही तेच केले. मात्र तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांना भीती विरोधकांची होती.
कार्यकर्त्यांनी फेकलेला गमछा विरोधक कुत्र्याच्या गळ्यात टाकतील आणि फोटो काढून पक्षाला बदनाम करतील म्हणून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते
खाली पडलेला एक एक गमछा उचलून व्यवस्थित करत होते. सत्ता आली की सर्वाना नशा चढते...पण पक्षनिष्ठा मोजक्या व्यक्तीत भिनलेली असते....
- चुडामण बोरसे.