तांदलवाडी, ता.रावेर, जि.जळगाव : तांदलवाडी येथील माध्यमिक विद्यालयात रावेर तालुका प्रगत शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १९ रोजी घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात आधुनिक शेती, सेंद्रीय शेती, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, सौर ऊर्जा, पर्यावरण, प्रदूषण, आरोग्य, गणितीय प्रतिकृती आदी विषयांवर एकूण १२६ उपकरणे सादर करण्यात आली.प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे होते. प्रमुख उपस्थिती रावेर पं.स.सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, जि.प.सदस्य कैलास सरोदे, आत्माराम कोळी, सुरेखा पाटील तसेच रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजीव पाटील, माजी आमदार राजाराम महाजन, सरपंच श्रीकांत महाजन, पं.स.सदस्य प्रकाश महाजन, जुम्मा तडवी, जितेंद्र पाटील, योगीता वानखेडे, कविता कोळी, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी एन.आर.तडवी, एन.के.शेख, केंद्रप्रमुख के.पी.चौधरी, राजेंद्र सावखेडकर आणि के.जी.महाजन, एस.के.महाजन, एम.टी.चौधरी, मुख्याध्यापक ए.आर.चौधरी, एन.व्ही.पाटील आदी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी प्रास्ताविक केले.तालुक्यातून विविध शाळेतून माध्यमिक गटातून ४०, प्राथमिक गटातून ५२, शिक्षक गटातून २०, लोकसंख्या शिक्षण पाच, आदिवासी गटातून ७, प्रयोगशाळा परिचर दोन असे एकूण १२६ उपकरणे प्रतिकृती सादर करण्यात आली होती.
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे तालुका विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 6:16 PM
तांदलवाडी येथील माध्यमिक विद्यालयात रावेर तालुका प्रगत शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १९ रोजी घेण्यात आले.
ठळक मुद्देप्रदर्शनात सादर करण्यात आली १२६ उपकरणेआधुनिक शेती, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, सौर ऊर्जा, पर्यावरण, प्रदूषण, गणितीय प्रतिकृती आदी विषयांवर उपकरणे