जळगाव : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ग्राम शिक्षण समित्या, वार्ड प्रभाग समित्या स्थापन तसेच सक्रिय करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रावेर, एरंडोल व पारोळा तालुक्याच्या शिक्षण समन्वय समित्या गठीत केल्या असून तसे आदेश निर्गमित केले आहे.
- रावेर समिती यांची निवड
रावेर तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य शिरीष मधुकर चौधरी यांची नेमणूक केली आहे. तर पंचायत समीतीचे सभापती पदसिध्द सदस्य असतील. इतर सदस्यात सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून प्रशांत चौधरी, किरण नेमाडे तसेच ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून रवींद्र पवार, दिलीप पाटील, प्रतिभा मोरे असतील. तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून सुभाष गाढे, मुबारक तडवी व पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून सुनील लासुरे, रवींद्र पाटील, राहुल पाटील आणि प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून सुधाकर झोपे, जे. के. पाटील यांनी निवड निवड करण्यात आली आहे.
- असे आहेत पारोळा समितीतील सदस्य
पारोळा तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य चिमणराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पदसिध्द सदस्य म्हणून पंचायत समितीच्या सभापती रेखा भिल तर इतर सदस्यात सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून दीपक पाटील, उत्तम पाटील असतील. ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून विनोद पाटील, सुभाष पाटील, मंदा पाटील यांची नेमणूक केली आहे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून अमोल सोनवणे, मिलींद सरदार यांनी तर पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर पाटील, भैय्या पाटील, समाधान पाटील व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून गोविंद टोळकर, मधुकर शिवदे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील हे सदस्य म्हणून असतील.
- एरंडोल समितीत यांनी नेमणूक
एरंडोल तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य चिमणराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पदसिध्द सदस्य म्हणून पंचायत समीतीच्या सभापती शांताबाई पाटील तर इतर सदस्यांत सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून दीपक महाजन, आधार पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून शरद बडगुजर, सचिन पाटील, भारत राठोड यांची तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून मनोहर खेडकर, रवींद्र लांडगे यांनी नेमणूक केली आहे. पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून प्रशांत पाटील, भास्कर शिंदे, संजय मराठे व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून राजेंद्र पाटील, संदिप महाजन तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज अहमद शेख हे सदस्य सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.