आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : तांबापुरा येथे शनिवारी रात्री साडे दहा वाजता एका गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यात मुकेश संतोष सपकाळे (रा.खेडी) या तरुणाला पकडून मारहाण झाली तर विजय लक्ष्मण बोदडे यांच्या हाताला एका जणाने चावा घेतला तर दगडफेकीत विकार खान जखमी झाला. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, सुप्रीम कॉलनीतील पोलीस लाईनमध्ये लग्नाच्या वरातीतून जाणाºया दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन हार्दीक पाटील या तरुणावर एकाने चॉपर हल्ला केला. त्यामुळे येथेही तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्रभर व रविवारीही या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.पूर्ववैमनस्याची किनारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकार खान व मुकेश सपकाळे यांच्यात सहा ते आठ महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यांच्यातील वादातून ही तणावाची घटना घडली आहे. विकार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर मुकेश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे दरम्यान, दगडफेक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, सहायक निरीक्षक समाधान पाटील, योगेश शिंदे, रोहन खंडागळे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, मनोज सुरवाडे यांच्यासह अन्य कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत दगडफेक करणाºयांची धरपकड केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागातील सर्व गुन्हे शोधच्या कर्मचाºयांना तातडीने आहे त्या स्थितीत तांबापुरा व सुप्रीम कॉलनीत पोहचण्याचे आदेश झाले होते. सुप्रीम कॉलनीत तणावसुप्रीम कॉलनीतील पोलीस लाईनमध्ये लग्नाची वरात सुरु असताना त्यावेळी दुचाकीवरुन घराकडे जात असलेल्या हार्दीक पाटील व गणेश शिंदे या दोघांच्या दुचाकीचा कट एका जणाला लागला. त्यावरुन तुंबळ हाणामारी झाली.
इच्छादेवी चौकीपासून दगडफेकतांबापुरातून १५ ते २० जणांचा एक गट इच्छादेवी चौकाकडे चालत आला. त्यातील आठ जण पोलीस चौकीवर बसले. तर उर्वरित चौकीच्या मागे गेले व त्यांनी अचानक दगड, विटांचा मारा सुरु केला. यावेळी मुकेश सपकाळे या तरुणाला अडवून मारहाण झाली. डोक्यात दगड टाकल्याने रक्तबंबाळ झालेल्या मुकेश याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. विजय लक्ष्मण बोदडे यांनाही दोन जणांनी पकडून ठेवत त्यातील एकाने त्यांच्या हाताच्या पंजाला चावा घेतला. दगडफेकीत विकार खान हा तरुण देखील जखमी झाला आहे. या दगडफेकीत जीव मुठीत घेऊन महिला या लहान मुलांना घेऊन धावत सुटल्या. फरशीचे तुकडे व विटांचा मारा सुरु झाल्यामुळे सर्वत्र पळापळ झाली. यावेळी हल्लेखोरांनी पोलीस चौकीवर देखील दगडफेक केली. बेबाबाई सोनु सुरवाडे या महिलेचा मुलगा दीपक याला मारहाण होत असल्याने पाहून बेबाबाई यांनी दुसºया अपंग मुलाला सुरक्षितस्थळी हलविले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून महिलांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने बॅनर लावल्यावरुन वादाची शक्यता वर्तविली होती.