जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.
ग्रंथदिंडीत अग्रभागी संत गाडगेबाबांच्या वेशातील कार्यकर्ता रस्ता सफाई करीत होता. बैलगाडीवर बसलेली अस्मिता चौधरी ही बहिणाबाईच्या वेशात जात्यावर दळण दळत होती. दिंडीतील पालखीत ठेवलेल्या ग्रंथाचे व संविधानाचे पुजन नगरसेविका संध्या पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी केले. दिंडीत न्यु इंग्लिश स्कुल, बोहरा सेंट्रल, एकलव्य प्राथमिक, द्नानगंगा, खादगाव जि. प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वातंत्र सेनानींच्या वेशभुषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते.