शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

खंडणी प्रकरण : सुनील झंवर यांच्याकडील ‘ते’ घड्याळ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 11:23 AM

खंडणी प्रकरण : दोन बिल्डरांचेही जबाब नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सूरज सुनील झंवर यांच्याकडून १ कोटी २२ लाखाची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात शनिवारी एसआयटीने सुनील झंवर यांच्याकडील ऑडीओ व व्हिडीओ चित्रीकरण झालेले घड्याळ गुन्ह्यात पुराव्याकामी जप्त केले. त्याशिवाय विठ्ठल तानाजी पाटील व अमित रमेश अविनाशे (दोन्ही रा.पुणे) यांचा जबाबही नोंदविण्यात आला. 

सूरज झंवर यांच्याकडून खंडणी स्वरुपात स्विकारलेली ही रक्कम परत मागण्यासाठी सुनील व सूरज झंवर चाळीसगाव येथील उदय पवार याच्या गोदामात गेले होते. तेव्हा पवार तेथे नव्हता, मात्र त्याच्या गोदामातील कर्मचाऱ्याने झंवर यांचे बोलणे करुन दिले होते. त्यावेळी जे संभाषण झाले ते सुनील झंवर यांनी घड्याळात चित्रीकरण केले आहे. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनील झंवर कारागृहातून जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर मार्च महिन्यात झंवर उदय पवार याच्याकडे खंडणी स्वरुपात घेतलेले पैसे परत मागायला गेले होते. त्याआधी कजगाव येथेही भेट घेतली होती. याच कालावधीत विधीमंडळात तेजस मोरे व ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यातील संभाषणाची क्लीप देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली होती.

संशयास्पद व्यवहाराच्या नोंदीबांधकाम व्यावसायिक अमित रमेश अविनाशे व ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या पत्नी ज्योत्स्ना यांनी मिळून ब्रम्हराज इन्फोसेस एलएलपी नावाची कंपनी स्थापन केली होती. अमित यांना एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. ६ फेब्रुवारी रोजी समन्स मिळताच ७ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या खात्यावरुन एक ते दीड कोटी रुपये ट्रान्सफर झाले. या संशयास्पद व्यवहाराची  चौकशी केली जात आहे. दुसरे बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पाटील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांचा मुलगा असून त्यांचाही दीड पानाचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी