रस्त्यांकडे दुर्लक्ष
जळगाव : शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांवर साधी डागडुजीही होत नसल्याने वाहनधारकांना कसरत करून या ठिकाणाहून वाहने न्यावी लागत आहे. यात अयोध्यानगरातील मुख्य रस्त्याच्या अगदी मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग हा नेत्र कक्षात हलविण्यात आला आहे. या ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांच्या केसेेस अधिक प्रमाणात येत असून दिवसाला किमान १५ ते २० केसेस अशा येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जाेर धरत आहे.
तपासण्या वाढविण्यावर भर
जळगाव : प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तपासण्या वाढविण्यावर भर दिला आहे. यात गेल्या आठवडाभरात रोज सरासरी ९ हजारांच्या आसपास तपासण्या होत आहे. शिवाय अनेक भागांमध्ये कॅम्पही घेतले जात आहेत. यात जळगाव शहरात सर्वाधिक चाचण्या होत आहेत.