फोटो : 9.31 वाजेचा मेल.सागर दुबे नावाने
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून सट्टा जुगार खेळणाऱ्या नितीन चंद्रकांत वाघ (रा.अजिंठा हाऊसिंग सोसायटी, एमआयडीसी) यास शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलिसांनी ढाके कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याजवळून ७४० रूपयांची रक्कम व पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
ढाके कॉलनीतील एका वखारीजवळ नितीन वाघ हा व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून सट्टा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता वाघ याला ऑनलाईन जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याजवळून ७४० रूपयांची रक्कम व पाच हजार रूपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्यास अटक केली आहे. त्यानंतर सचिन मुंढे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नोकरीतून केले कमी अन् सट्टा जुगार खेळण्यास सुरुवात
एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेला संशयित नितीन वाघ हा शिक्षकी पेशात होता. मात्र, नोकरीतून कमी करण्यात आल्यानंतर त्याने ऑनलाईन सट्टाजुगार खेळण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, मुदस्सर काझी, इमरान सैय्यद, योगेश बारी आदींनी केली आहे.