शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

शिक्षक दिन विशेष : पालकांनी इंग्रजी शाळेतून काढून मुलांना घातले जिल्हा परिषदेच्या शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:07 PM

लोकसहभागातून जमविले १२ लाख

ठळक मुद्देसौर शाळा बनविणारग्रामस्थांनी दिली साथ

सागर दुबेजळगाव : सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत असताना सावखेडा खुर्द गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मात्र त्यास अपवाद ठरली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून काढून काही मुले या जि.प.शाळेत परतली आहे. कदाचित ही पहिली जि.प. शाळा असावी.जळगावपासून २४ किलोमिटर अंतरावर तापीनदीच्या काठावर असलेल्या सावखेडा खुर्द येथे सन १९५५ मध्ये जि़प़शाळेची स्थापना झाली आहे़ मध्यंतरी पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यम व शहरातील शाळांकडे वाढल्यामुळे जिल्हा परिषद शाळा ओस पडल्या होत्या. दरम्यान, मुख्याध्यापक चौधरी यांनी शाळेत विविध विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवून शाळेचा लौकीक वाढविला आहे. जि.प.प्राथमिक शाळेने आपले वेगळेपण सिध्द करत जे खाजगी शाळा आणि इंग्रजी माध्यमांचा शाळांना जमले नाही, ते करुन दाखविले आहे. विद्यार्थ्यांना दर्जदार शिक्षण मिळत असल्यामुळे बाहेरील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा या शाळेत प्रवेश घेतले आहे़या शाळेत तब्बल वर्षभरात शंभर विविध उपक्रम राबविण्यात येतात़ मुख्याध्यापक अरूण चौधरी यांनी शाळेचे चित्रच बदलून टाकले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील पालकांकडून आपल्या पाल्यांचे प्रवेश सावखेडा खुर्द जि.प.शाळेत व्हावेत यासाठी प्रयत्न असतात.लोकसहभागातून जमविले १२ लाखशाळा डिजीटल होण्यासाठी व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेचे शिक्षण मिळावे यासाठी लोकसहभागातून तब्बल १२ लाख रूपये अरूण चौधरी यांनी जमविले़ त्यातून शाळेला रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी खेळणी, संरक्षण भिंती, विद्युत उपकरणे, डिजीटल शिक्षणाची साहित्य खरेदी करून शाळेची नवीन निर्मिती केली़ विद्यार्थ्यांना गणेश सुध्दा मोफत देण्यात आले आहे़ दोन दिवसाआड तीन वेगवेगळी गणवेश विद्यार्थी परिधान करून शाळेत येत असतात़सौर शाळा बनविणारग्रामीण भाग असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होत असते़ त्यामुळे लोकसहभागातून ही शाळा सौरशाळा बनविण्याचा ध्यास आता मुख्याध्यापक चौधरी यांनी केला आहे़यामुळे वीज ही समस्याच राहणार नसल्यामुळे संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा डिजीटलचे धडे घेणाºया विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण यातून निर्माण होणार नाही़ग्रामस्थांनी दिली साथजिल्ह्यात आदर्श ठरणारी सावखेडा खुर्द जि़प़ शाळेच्या स्थितीला सुधारण्यासाठी गावातील शेतकºयांसह ग्रामस्थांनी चौधरी यांना साथ अर्थात मदत मिळाली़ एक आदर्श आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शाळा कशी असावी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर अरुण चौधरीच्या प्रयत्नांना मदत करण्याची तयारी दर्शविली. अन् आज इंग्रजी शाळेऐवजी या शाळेत पाल्यांचा प्रवेश व्हावा,यासाठी पालक या शाळेत धाव घेतात़जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकन शाळा४अरुण चौधरी हे सावखेडा येथे रुजू झाल्यावर या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ही बोटावर मोजण्या इतपत होती. त्यामुळे जि.प.शाळेत मुलांची संख्या वाढविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. अरुण चौधरींनी आपल्या सहकाºयांसोबत शाळेत विविध उपक्रम राबविले सोबतच विद्यार्थ्यांना डिजीटल धडे दिले़ यातून विद्यार्थी संख्येत वाढ होऊन इतर शाळांना मागे टाकत पुढे निघाली, अन् अखेर जिल्ह्यातून पहिली ‘आयएसओ’ मानांकन मिळवणारी सावखेडा खुर्द ही पहिली जि़प़शाळा ठरली़दप्तरमुक्त शाळा़़़ सावखेडा खुर्द जि़प़ शाळा ही जिल्ह्यातून आयएसओ मानांकनासह दप्तरमुक्त शाळा ठरली आहे़ विद्यार्थ्यांना शिक्षणात रस वाढावा व मनोरंजक पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला टॅब देण्यात आली आहेत़ त्यामुळे ही शाळा दप्तरमुक्त झाली आहे. सुरुवातीला चौधरी यांनी स्वखर्चाने टॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. त्यानंतर गावातील मोठ्या शेतकºयांनी व शिक्षण विभागाने देखील विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले. अरुण चौधरींच्या याच कल्पक उपक्रमांची दखल जिल्हा परिषदेने घेत त्यांना २०१५ यावर्षी जि.प.कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव