शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामासाठी उपस्थित राहता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:15 AM

संचारबंदीत फिरल्यास कडक कारवाई जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश कायम ठेवले आहेत. या सात ...

संचारबंदीत फिरल्यास कडक कारवाई

जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश कायम ठेवले आहेत. या सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे.

परीक्षा घेण्यास सूट

१५ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी या काळात परीक्षा घेता येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी राऊत यांनी काढले आहेत.

आठवडे बाजार पुन्हा बंद

आठवडे बाजारावर दोन आठवड्यांपूर्वी निर्बंध घातले गेले तरी अनेक ठिकाणी बाजार भरविण्याचा प्रयत्न झाला होता. आता पुन्हा आठवडे बाजार बंद ठे‌वण्याचाही निर्णय घेण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

लग्न समारंभंविषयी बंधने कायम

लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करताना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

ऑटोरिक्षात चालक वगळता केवळ दोन व्यक्तींचा प्रवास

संपूर्ण जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) घोषित करण्यात आली आहे. या संचारबंदीदरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार (संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील); बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहणार आहे. ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, पेट्रोलपंप, गॅरेजेस अशा आस्थापनांना सूट राहणार आहे.

केवळ निवेदन देता येणार

गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी घालण्यात आली आहे. यात केवळ ५ जणांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल, असे आदेशात म्हटले आहे.

कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना व आदेश

- अभ्यासिका ( लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील.

- सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रम यांना बंदी

- सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळेस केवळ १० जणांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरिता खुली राहतील.

- सर्व प्रकारचे सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.

- सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रम यांना बंदी तसेच सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी

- कायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादेत परवानगी राहील. मात्र याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहणार आहे. मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगाव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सूट राहणार आहे.

- सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहणार आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांवर राहणार आहे.