जळगाव : जगभरात सर्वत्र मातृत्वाची भावना सारखीच असून समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी ‘आई’ हे एक उत्तर आहे. भारतातील मातृत्वाचे संस्कार हे मायेचे ‘ममत्व’ शिकविणारे आणि जगालाही मातृत्वाचे संस्कार देणारे आहेत, आपल्याकडील मातृ संस्कारात विश्वगुरु होण्याची ताकद आहे, अशी भावना ‘मदर्स आॅन व्हील्स’या कार्यक्रमात जगभम्रंती केलेल्या मातांनी व्यक्त केली.चार महिलांनी चारचारकी वाहनाने ६० दिवसात २२ देशांमध्ये २३ हजार ६५७ कि.मी. प्रवास केला. त्यातील शीतल वैद्य -देशपांडे(पुणे), माधवी सहस्त्रबुद्धे (दिल्ली) व उर्मिला जोशी (पुणे) या तीन महिला शनिवारी जळगावात आल्या. त्यानिमित्त उद्यमी महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी ‘मदर्स आॅन व्हील्स’ या मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रेवती शेंदुर्णीकर व सोनिका मुजूमदार यांनी प्रकट मुलाखत घेतली. व्यासपीठावर महापौर सीमा भोळे, भवरलाल व कांताबाई जैन चॅरीटेबल ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन, पतसंस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी जोशी, उपाध्यक्षा पद्मजा अत्रे व व्यवस्थापकीय संचालिका अनिता वाणी उपस्थित होत्या.देशपांडे, सहस्त्रबुद्धे व जोशी यांनी सांगितले की, युरोपमध्ये त्यांना एकल माता पद्धत दिसून आली. लग्नाचे आमिष दाखवून १५ ते १६ वयोगटातील मुली या माता झालेल्या दिसून आल्या. आपल्याकडे जर मुलगा आई-वडिल वयोवृद्ध होईपर्यंत त्यांच्या सोबत एकत्र परिवारात राहत असेल, तर सर्वांना आनंद होतो. विदेशात मात्र पंधरा वर्षांचा मुलगाही आईला ओझे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक हेमा अमळकर यांनी केले तर सूत्रसंचालन मनिषा खडके व अॅड. उज्ज्वला कुलकर्णी यांनी केले.दुसऱ्या देशात महामृत्यूंजय मंत्राचा जपजो महामृत्यूंजय मंत्र भारतातच ऐकायला मिळतो तो मंत्र दुसºया देशात ऐकायला मिळाल्याने आश्चर्य वाटले असल्याचे या मातांनी सांगितले. या देशातील नागरिक दररोज १०८ वेळा या मंत्राचा जप करतात. विशेषत : येथील गर्भवती महिला हा नित्यनेमाने जप करतात. या मंत्रामुळे माझे आणि माझ्या मुलाचेही रक्षण होईल आणि ते सुसंस्कारित होतील, तेथील महिलांनी सांगितल्याचे या मातांनी या वेळी सांगितले.
मदर्स आॅन व्हील्स : आपले मातृ संस्कार मायेचे ममत्व शिकविणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:54 PM