जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव विभागस्तरीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत रायसोनी आयबीएम आणि मुलींच्या गटात संत गाडगेबाबा महाविद्यालयाने विजय मिळवला आहे. मुलींमध्ये तेजश्री वाघ हिने तर मुलांच्या गटात इशांत इनामदार याने सुवर्ण पदकाची कमाई केली. ही स्पर्धा बुधवारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात १४० आणि मुलींच्या गटात ६० खेळाडू सहभागी झाले होते.विभागीय बुद्धिबळ स्पर्धा २२ आणि २३ सप्टेंबर रोजी साक्री येथील एस.जी. पाटील महाविद्यालयात होणार आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत आघाडीवर असलेल्या इशांत इनामदार आणि तेजश्री वाघ यांनी या स्पर्धेत विजय मिळवला.पंच म्हणून प्रवीण ठाकरे, प्रा. आसिफ खान यांनी काम पाहिले. यशस्वितेसाठी पवनकुमार देवरे, कार्तिक मालविया, ललित झांबरे, महेश व्यास, वर्षा सोनवणे यांनी काम पाहिले.
मुलांच्या गटात रायसोनी आयबीएमने सांघिक विजेतेपद पटकावले. रायसोनी आयबीएम आणि मू.जे. महाविद्यालयाने १८.५ गुणांची बरोबरी साधली. मात्र टायब्रेकर पद्धतीने रायसोनी आयबीएमला विजयी घोषित करण्यात आले. मू.जे.ने द्वितीय स्थान पटकावले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावले.मुलींच्या गटात संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने १५ गुणांसह जेतेपद पटकावले. तर १४ गुणांसह मू.जे. महाविद्यालय दुसºया तर १३.५ गुणांसह कोटेचा महिला महाविद्यालय तिसºया स्थानावर राहिले.
विभागीय पातळीवर निवड झालेले खेळाडू मुले - इशांत इनामदार (शासकीय अभियांत्रिकी), जलीस कुरेशी (रायसोनी आयबीएम), आकाश धनगर (नूतन मराठा महाविद्यालय), निखिल पाटील (मू.जे. महाविद्यालय), शोएब शेख (रायसोनी आयबीएम).मुली - तेजश्री वाघ (मू. जे. महाविद्यालय), फाल्गुनी चौधरी (जे.टी. महाजन महाविद्यालय), दिव्या कोळी (कोटेचा महाविद्यालय), श्रुती काबरा (बाहेती महाविद्यालय), दीक्षिता गुजर (शासकीय अभियांत्रिकी).