जळगाव : आठवडाभरापासून त्रासदायक ठरणारी उष्णतेची लाट कायम असून, त्याचा फटका वृद्ध, रुग्ण व बालके यांना अधिकचा बसत आहे. अंगाची लाहिलाही होत असल्याने अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. यातच सोमवारी जैन हिल्स येथील हवामान शास्त्र विभागात 44.5 एवढय़ा कमाल तापमानाची नोंद झाली. अबरी समुद्र क्षेत्रात हलके कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. लू वारे पश्चिमेकडून पूव्रेकडे अधिक गतीने येत असून, याचा फटका बसत आहे. ही उष्ण वा:यांची लाट पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घराबाहेर निघण्यास कुणी धजावेनाउष्णता एवढी त्रासदायक आहे की, अनेकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळले. यामुळे दुपारी रस्त्यांवरील वर्दळ अतिशय कमी झाली होती. अगदी आकाशवाणी चौक ते पुढे रिंगरोड, काव्यरत्नावली चौक, नवी पेठ भागातही वर्दळ कमी होती. अतिउष्णतेमुळे नागरिकांसोबतच पशु-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. तसेच शेतीलाही मोठय़ा प्रमाणात फटका बसत आहे उष्ण वा:यांचा प्रकोप कायम राहणारआणखी सात ते आठ दिवस उष्ण वा:यांचा प्रकोप कायम राहणार आहे. लू वा:यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहील. हवेत आद्र्रताही कायम असल्याचे दिसून येत आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सुदाम पाटील म्हणाले. दिवसभरातील तापमानाची स्थितीसकाळी 8 वा.- 329 वाजता- 3610 वाजता - 3811 वाजता - 4112 वाजता - 421 वाजता - 44.52 वाजता- 44.43 वाजता- 44.15 वाजता- 40.0मागील काही दिवसांचे तापमान14 एप्रिल - 43.215 एप्रिल - 43.816 एप्रिल - 44.5
तापमान 44.5 अंश सेल्सीअसवर स्थिर
By admin | Published: April 18, 2017 1:10 AM