कुठल्याही भक्ताला दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. म्हणून भक्त व वारकऱ्यांनी शेंदुर्णी येथे आषाढी एकादशीला देव दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने, तसेच मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे. शासनाच्या कोरोना निर्देशाचे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे शांतता समिती सदस्यांनी सांगितले.
मुस्लिम समाज बांधवांनीही कोरोना पार्श्वभूमीवर बकरी ईद सार्वजनिक साजरी न करता आपापल्या घरी साजरी करून शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी केले आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, जिल्हा परिषद माजी सदस्य सागरमल जैन, माजी उपसभापती सुधाकर बारी, पंडित दीनदयाळ पतसंस्था अध्यक्ष अमृत खलसे, माजी उपसरपंच पंडितराव जोहरे, नगरसेवक शरद बारी, शंकर बारी, ह.भ.प. कडोबा माळी, भगवान त्रिविक्रम मंदिर पुजारी भोपे, बशीर खाटीक, फारूक खाटीक, अकिल खाटीक उपस्थित होते.