जळगाव : जिल्हाभरात मंगळवारी एकाच दिवसात दहा बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे़ मृत्यूची संख्या २४४ वर पोहचली आहे़ दुसरीकडे शहरातील कोरोनाचा संसर्ग थांबत नसून पुन्हा सर्वाधिक २९ रुग्ण हे शहरात आढळले आहे़जामनेर तालुक्यातील ६५ वर्षीय दोन व एक ५५ वर्षीय महिलेचा तसेच जळगाव शहरातील ५५ वर्षीय पुरूष, भुसावळ तालुक्यातील ५० व ६६ वर्षीय वृद्ध, यावल तालुक्यातील ५८ वर्षीय महिला व ४० वर्षीय प्रौढ, धरणगाव तालुक्यातील ८५ वर्षीय महिला व एरंडोल तालुक्यातील ५५ वर्षीय प्रौढाचा मृतांमध्ये समावेश आहे़ यातील जामनेर तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू हा तीन दिवसांपूर्वी झाला आहे.
कोळीपेठेत विस्फोट, सहा रुग्णइंद्रपस्थ नगर, विद्युत कॉलनी या नवीन भागात कोरोनाने शिरकाव केला आहे़ तर कोळीपेठ आंबेडकर नगर या भागात एकाच दिवसात सहा रुग्ण आढळून आलेले आहेत़ यासह इंद्रप्रस्थनगरात तीन बाधित रुग्ण आढूळून आलेले आहेत़ तर विद्युत कॉलनी येथे एक रुग्ण आढळून आला आहे़ यासह के़ सी़ पार्क ३, शिवाजीनगर, ओंकारनगर, उस्मानिया पार्क, येथे प्रत्येकी दोन गेंदालाल मिल, मुक्ताईनगर, कांचननगर, विद्युत नगरी महाबळ, शिवकॉलनी, तांबापुरा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.