भडगाव : विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम अंतर्गत भडगाव तालुक्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत नवीन मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात एकुण १० हजार १८० मतदारांची नोंदणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी तहसिल कार्यालयाची निवडणूक यंत्रणा जोमात कामाला लागली असून ती सज्ज झाली आहे.राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तालुक्यात विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमातंर्गत नवीन मतदार नोंदणी मोहीम तहसिलच्या निवडणूक प्रशासनामार्फत राबविण्यात आली. यात तालुक्यात एकुण १० हजार १८० नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. यात ६ नं. फार्मद्वारे नवीन मतदार नोंदणी ४ हजार ६१९ इतकी करण्यात आली. तर ७ नं. फार्मद्वारे मतदार नोंदणी १ हजार ९१२ आणि ८ नं. फार्मद्वारे नवीन मतदार नोंदणी , नावे दुरुस्ती व फोटो अद्ययावत करणे अशी ३ हजार १४६ नोंदणी करण्यात आली. तर अपंग मतदार नाव नोंदणी ५३१ इतकी करण्यात आली. नवीन मतदार नाव नोंदणी मोहीमेत तालुक्यातील शाळांच्या १४५ बीएलओंनी चांगले काम पाहीले. त्यांचा निवडणूक शाखेतर्फे गौरवही करण्यात आला आहे.भडगाव तहसिलच्या निवडणूक विभागात तहसिलदार सी. एम. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली निवङणुक नायब तहसिलदार अशोकराव कोल्हे, निवडणूक लिपीक चेतन राजपूत यांच्यासह ५ ते ६ कर्मचारी कामकाज पाहत आहेत. तालुक्यात एकुण १४५ मतदान केंद्र आहेत. तालुक्यातील गिरड ते आमडदे जि. प. गटात ३० मतदान केंद्र आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील अंतीम मतदार यादी ११ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहितीही कोल्हे यांनी दिली. निवडणुकीकामी तालुक्यातील शाळांचे एकुण १ हजार २०० कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. यासाठी सरकारी कार्यालये, खाजगी, माध्यमिक शाळा, कॉलेज, जि. प. प्राथमिक शाळा, खाजगी प्राथमीक शाळांमधील कर्मचाºयांची माहिती तहसिलमधील निवडणूक प्रशासनानेअंतीम मतदार यादी ११ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध होणार
भडगाव तालुक्यात दहा हजार नवीन मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 1:02 AM
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार पुनर्रिक्षणाअंतर्गत भडगाव तालुक्यात १० हजार १८० नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देतालुक्यातील १४५ बीएलओंनी चांगले काम पाहीलेअंतीम मतदार यादी ११ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध होणार