आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.३ : कापूसवाडी, ता.जामनेर येथील ग्रामपंचायतीने गावात होत असलेली दारु विक्री व अवैध धंदे रोखण्यासाठी पाऊल उचलेले आहे. अवैध धंदे करतांना आढळून आल्यास संबधित इसमास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. गावातील अवैध धंदे बंद करावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पोलिसांना दिले.कापूसवाडी ग्राम पंचायतीची सभा सरपंच आर. बी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. गावात सट्टा, जुगार व दारु विक्री वाढल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. त्यांनी अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामसभेत केली. त्यानुसार या विषयावर चर्चा सुरु झाली. चर्चेअंती अवैध धंदे करणाºयांवर यापुढे दहा हजार रुपये दंड आकारण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी जामनेर पोलीस स्टेशनेचे पोलीस निरीक्षक नजीर शेख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चरणसींग पाटील, भगवान जाधव, गजानन कोळी, राहुल सपकाळ, सुरज पाटील पंडित ढोणी, राजेंद्र नाईक आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
अवैध धंदे चालकांना होणार दहा हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 5:39 PM
कापूसवाडी ग्रामपंचायतीने केला बहुमताने ठराव मंजुर
ठळक मुद्देकापसूवाडीत अवैध धंदे करणाºयांना होणार दहा हजाराचा दंडग्रामसभेत महिलांनी व्यक्त केला अवैध धंद्यांविरोधात संतापजामनेर पोलीस निरीक्षकांना दिले अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन