ऑनलाईन लोकमत / किशोर पाटील
जळगाव, दि. 20 - पर्यावरण पूरक गणशोत्सवासाठी शासनामार्फत विविध पातळींवर उपाययोजना केल्या जात आह़े यालाच अनुसरुन जनमानसात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी, यासाठी शहरातील दहा वर्षीय श्रेयस योगेश शुक्ल या विद्याथ्र्याची धडपड सुरू आह़े दोन वर्षापासून श्रेयस स्वत:च्या हाताने शाडू मातीपासून मूर्ती बनवून नातेवाईक व मित्रांर्पयत पोहचवित आह़े यापलीकडे जाऊन तो गल्लीतील व शाळेतील मित्रांनाही मूर्ती बनविण्याचे धडे देत असून घरा-घरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या शासनाच्या उपक्रमास हातभार लावत आह़े शहरातील नागेश्वर कॉलनीतील रहिवासी रंगकर्मी योगेश शुक्ल व मू़ज़े महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रध्दा शुक्ल याचा श्रेयस हा चिरंजीव. तो सध्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड या शाळेत पाचवीच्या वर्गात आह़े शाळेत झालेल्या स्पर्धेत शाडू मातीच्या मूर्तीचे पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्व त्याला कळाल़े दुसरीत असताना त्याने पहिल्यांदा शाडूची मातीची मूर्ती बनविली़ व घरी गणशोत्सव साजरा केला़नातेवाईकांसह, शेजारी, शाळेतील विद्यार्थी यांच्याकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी श्रेयसने त्याच्या मित्रांनाही मूर्ती बनविण्याचे धडे दिले आह़े तेही स्वत:च्या हाताने मूर्ती बनवून गणशोत्सव साजरा करत आह़े नागेश्वर कॉलनीत त्याचा ललित हा राजस्थानी कु टुंबांतील मित्र हा श्रेयसच्या प्रोत्साहातून स्वत: शाडू मातीची मूर्ती बनवून यंदा गणेशोत्सव साजरा करत आह़े यावर्षी मू़ज़ेमहाविद्यालयातील ज्ञानज्योत मंडळाने श्रेयसला शाडू मातीच्या गणेशाची मागणी केली आह़े केवळ मूर्तीच नाही तर तो टाकाऊ पासून टिकावू वस्तूची निर्मिती करतो. घरच्याप्रमाणे नातेवाईकांच्या घरी पर्यावरण पूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी श्रेयस स्वत: बनविलेली मूर्ती आजी, बाबा, तसेच बाहेर गावी असलेली मावशी, मामा या नातेवाईकांर्पयत पोहचतोय़ दोन वर्षापासून त्याचा हा उपक्रम सुरु आह़े उंदरावर बसलेली, टिळक फेटा याप्रमाणे दरवर्षी नव-नवीन मूर्ती तयार करतो़ मूर्ती कलात्मकदृष्टय़ा परिपूर्ण व्हावी, यासाठी त्याला रसिका मुजूमदार यांचे मार्गदर्शन लाभत आह़े