मुक्ताईनगर, जि.जळगाव : बºहाणपूर-अंकलेश्वर व अन्य रस्त्यांच्या कामाच्या निविदा तत्काळ काढून त्या मार्गी लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विधानभवनात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.रावेर लोकसभा मतदारसंघातील बºहाणपूर-अंकलेश्वर रस्ता व इतर रस्त्यांसंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, तसेच राष्ट्रीय महामागार्चे मुख्य अभियंता विनय देशपांडे, जळगावचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी हे प्रमुख बैठकीत उपस्थित होते.बैठकीमध्ये बºहाणपूर-अंकलेश्वर या महामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याकरता निविदा काढण्याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश देण्यात आले आहेत. आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व स्थानिक आमदारांनी डीपीडीसीमध्ये मागणी केल्याप्रमाणे रस्ता टिकाऊ होण्यासाठी व जनतेची वाहतुकीची सोय होण्याकरिता हायब्रीडमध्ये प्रस्तावित करून डीपीआर तयार करण्याबाबत व त्वरित निविदा करण्याबाबत आदेश देण्यात आले. यासोबतच यावल तालुक्यातील बºयाच दिवसांपासून चोपडा- जळगाव या तालुक्यांना जोडणारा शिरागड कोळन्हावी पुलाच्या रखडलेल्या कामासाठी खासदार रक्षा खडसे यांनी केलेल्या विनंतीप्रमाणे आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी शहादा ते शिरपूर (धुळे जिल्हा हद्दीमध्ये) १९ किलोमीटर लांबीचे रुंदीकरणाचे काम मंजूर असल्याने ते काम लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली व ती विनंती मान्य करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दोन्ही कामांचा डीपीआर तयार करून त्वरित निविदा काढण्याबाबत आदेश दिले. बºहाणपूर-अंकलेश्वर या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी व वाहनधारकांना सोयीस्कर होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता खराब असून, डागडुजी केल्यानंतरही रस्ता नादुरुस्त अवस्थेत असल्याने नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होत होती.
रावेर लोकसभा मतदारसंघातील बºहाणपूर-अंकलेश्वर रस्त्याची निविदा लवकरच मंत्रालयात महसूलमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 1:31 AM
मुक्ताईनगर, जि.जळगाव : बºहाणपूर-अंकलेश्वर व अन्य रस्त्यांच्या कामाच्या निविदा तत्काळ काढून त्या मार्गी लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २७ नोव्हेंबर रोजी ...
ठळक मुद्देविधानभवनात खासदार रक्षा खडसे व एकनाथराव खडसे यांच्यासमवेत झाली बैठकमहामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याकरता निविदा काढण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश