शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खांब हटविण्यासाठी महावितरणकडून निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:23 PM

जळगाव : महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निविदा प्रक्रिया काढली आहे. कालिंका माता मंदिर ते खोटे ...

जळगाव : महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निविदा प्रक्रिया काढली आहे. कालिंका माता मंदिर ते खोटे नगरपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत खांब हटवून व त्यानंतर नवीन विद्युत लाईन उभारणीसाठी महावितरणने चार कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.शहरा गेलेल्या सुमारे ८ किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. चौपदरीकरणासाठी ६ आॅक्टोबरपासून निविदा प्रक्रिया सुरु झाली असून, आज निविदा भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान खांब हटविण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी व इतर अधिकाऱ्यांनी यापूर्वीच जागेची पाहणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडे खर्चाचे अंदाजपत्रकही पाठविले. त्यानुसार, चार कोटी ११ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर महावितरणने पोल हटविण्यासाठी निविदा प्रक्रिया काढली आहे.७ किलोमीटर पर्यंत नविन वीज वाहिनी टाकण्यात येणार४चौपदरीकरणाच्या कामासाठी महावितरणतर्फे काढण्यात आलेल्या निविदेत म्हटले आहे की, कालिका माता मंदिर ते खोटेनगर या ७ किलोमीटर अंतरावरील वीज वाहिनी हटविण्यात येणार आहे. या ठिकाणी ३३ केव्ही व ११ केव्हीच्या मुख्य वाहिन्या असून, या वाहिन्या हटविल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी ठराविक अंतरावर नवीन वीज वाहिनी उभारायची आहे. या कामासाठी इच्छुक मक्तेदारांनी सर्व कागपत्रांसह महावितरणच्या वेवसाईटवर आॅनलाईन निविदा भरायची आहे.३३ केव्ही आणि ११ केव्हीच्या मुख्य वाहिन्यांवर घरगुती वीज ग्राहकांसह औद्योगिक ग्राहकांचादेखील समावेश आहे. खांब हटवितांना वीज पुरवठा खंडित होऊन, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणने या ठिकाणचे खांब हटविण्याआधी नवीन वीज वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आाहे. ही नवीन वाहिनी टाकण्यासाठी विद्युत तारा, खांब, जनित्र व इतर साधनसाम्रुगी खरेदी व इतर कामासांठी महावितरणला ४ कोटींचा निधी लागणार आहे. दरम्यान, नविन वीज वाहिनी टाकल्यावरच, महामार्गावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव