शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

शिवरायांचा पुतळा हलविण्यावरून तणाव, दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्य चौकात बसवला. ...

ठळक मुद्देनिमखेडी खुर्द येथील घटना : नऊ जणांना अटक, तीन पोलीस जखमी
लोकमत न्यूज नेटवर्कमुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्य चौकात बसवला. या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ताफ्याने ग्रामस्थांची समजूत घालत असताना अचानक ग्रामस्थांकडून झालेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, निमखेडी खुर्द गावातील मुख्य चौकात ओट्यावर चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. सकाळी या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सपोनि नीलेश सोळुंके, कैलास भारास्के, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रमोद झांबरे यांच्यासह अधिकारी वर्ग सकाळी नऊला गावात पोहोचले. त्यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांची समजूत घातली. तरीही ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी राहील, अशी आग्रही मागणी गावातील तरुण, पुरुष, महिला यांनी लावून धरली. एवढेच नव्हे तर पुतळा हटवल्यास आम्ही आमच्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ, अशा धमक्यासुद्धा काही ग्रामस्थांनी याप्रसंगी प्रशासनाला दिल्या. समजूत घालत असतानाच अचानक दगडफेकतहसीलदार श्वेता संचेती ग्रामस्थांची समजूत घालत असतानाच अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. या दगडफेकीत उपविभागlय पोलीस कार्यालयाचे कर्मचारी विजय कचरे, वरणगावचे सपोनि संदीपकुमार बोरसे तसेच आरसीपी प्लाटूनचे पोलीस कर्मचारी मोहसीन शेख यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. मोसीन शेख यांच्या छातीवर वीट लागली, तर विजय कचरे यांच्या हाताला १० टाके पडले. बंदोबस्तासाठी दोन आरसीबी स्त्रायकिंग फोर्स, मुक्ताईनगर बोदवड येथील तसेच वरणगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा जवळपास १०० जणांचा ताफा गावात आहे. या दरम्यान पोलिसांनी पुतळा हटवला.दोषींवर कारवाई करणारदरम्यान, मंगळवारी दुपारी दोनला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी गावात भेट दिली. याप्रसंगी मुंडे यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.पळापळीनंतर वृद्धाचा घरी मृत्यूगावातील या घटनेत पोलिसांवर दगडफेक सुरू झाल्यानंतर पळापळ सुरू झाली. यात गावातील ८५ वर्षीय वृृृद्ध रघुनाथ मोतीराम डहाके यांचा घरी मृत्यू झाला. आजच्या घटनेचा येथे काही संबंध नसल्याचे पो.नि. शिंदे यांनी सांगितले.अजून ९० ते १०० जणांवर कारवाई होणारनिमखेडी खुर्द येथे बेकायदा पुतळा बसवल्या प्रकरणी हवालदार संजीव पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन संशयित म्हणूृन दीपक बाबूलाल डहाके, गजानन दिनकर घोगरे, अतुल विलास डहाके, मंगेश रामकृृष्ण मराठे , सतीश सुधाकर डहाके, देवेंद्र रमेश डहाके, कैलास विठ्ठल डहाके, अरविंद भीमराव लोमटे, मंगल फरदडे यांच्यासह तीन अल्पवयीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन वगळता नऊ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमदर्शनी १२ संशयित आरोपी करण्यात आले आहेत. अजून ९० ते १०० संशयितांवर कारवाई होणार असल्याचे पो.नि. सुरेश शिंदे यांनी सांगितले.
टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज