यावल, जि.जळगाव : ग्रामपंचायत कार्यालयाचे नाव उर्दूत टाकावे या मागणीसह टिपू सुलतान व डॉ.अब्दुल कलाम यांचे कार्यालयात छायाचित्र लावण्याच्या मागणीवर ग्रा.पं.च्या काही सदस्यांनी विरोध केल्याच्या कारणावरून तालुक्यातील साकळी येथे प्रजासत्ताक दिनी झालेल्या वादावरून दोन गटात दंगल झाली. दंगलीत दोन्ही गटांकडून एकमेकावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय, खासगी वाहनावर व रहिवाशांंच्या घरावर दगडफेक केली.पोलिसांनी जमावास रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण करून एका खासगी वाहनाच्या काचा जमावाने फोडल्या तर एका घरातील टीव्ही फोडण्यात आला आहे. यावरून पो. कॉ.सुशील घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३४ संशयितांसह अन्य १५ ते २० जणांवर दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दंगलीमुळे गावातील वातावरण भयभीत झाले असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंंग, पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी गावात ठाण मांडून आहेत. गावात तगडा पोलीस बंदागबस्त तैनात करण्यात आला आहे.शनिवारपासून गावातील सर्व व्यावसायिक दुकाने बंद असून व्यवहार ठप्प पडले आहेत. त्यामुळे गावात संचारबंदीप्रमाणे स्थिती आहे. दरम्यान, पोलिसांनी १४ संशयिताना अटक केली आहे. शनिवारी अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गावातील परिस्थितीची पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या.तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रजासत्ताक दिनानिमीत्ताने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामंपचायतीच्या कार्यालयाचे नाव उर्दूत टाकावे यासह कार्यालयात टिपू सुल्तान व डॉ. अब्दुल कलाम यांचे छायाचित्र लावण्यात यावे, अशी मागणी काही जणांनी केली. त्यास जणांकडून विरोध करण्यात आल्याच्या कारणावरून सभागृहातच हाणामारीस ुसुरवात होऊन हाणामारीचे रूपांतर दंगलीत झाले. दोन्ही गटांकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेकडो लोक आक्रमक झाले व दगड, विटांनी एकमेकांवर दगडफेक करू लागले. ग्रामपंचायत कार्यालयासह रहिवाशांंच्या घरावर तसेच गोपाळ चौधरी यांच्या कार (एमएच-०२-जेपी-९७८८) च्या काचा फोडल्या. तसेच नरेश महाजन, इंदुबाई माळी, योगेश माळी, शांताराम शिंपी, यांच्या घरावर दगडफेक केली. यात नरेश महाजन यांच्या घरातील टीव्ही फुटला आहे. पोलिसांनी जमावास रोखण्याचा प्रयत्न केला असता दंगलखोरांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला, अशा आशयाची फिर्याद पो.कॉ.सुशील घुगे यांनी दिली. संशयितामध्ये वसीमखान आसीफखान, अशफो शे. शौकत, रईसखान लियाकतखान, आसीफखान अजगरखान, कासीमखान ताहेरखान, अख्तर शे. अजीज, मोमीन समशेर तडवीश शे. शोएब शे. फय्याज शे. इरफान शे. रउफ, शे. अजगर अ. अजीज, शाहीदखान अजीजखान, शे. तन्वीर शे. कादर, शे. मोहसील शे. मोहम्मद, शे. रफीक शे. मुनाफ, ताहेरखान मुसाखान, शे. अन्सार शे. रहेमान, शाहबाजखान इस्माईलखान, शे. रज्जाक शे. नबी, शे. अब्ुदल रहेमान शेख, इम्रानखान सईदखान, शे. तौसीफ शे. गुलाब, तौसीफ गुलाम मिस्त्री, मतीन कुरेशी, साादिक कुरेशी, मोहम्मद रसीद बेकरीवाला, नुर शे. खालीद, समीर फारुख खाटीक, सद्याम मुन्ना पिंजारी, असलम सरदार पिंजारी, नूर रफीक मन्यार, शकीलखान नजीरखान, शे. शाहरुख शे. युनुस मन्यार, स. अकरम स. अरमान, गोलू उर्फ अजय संतोष कोळी व त्याचे १५ ते २० साथीदार असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पो. नि. डी. के. परदेशी , पोहेकॉ. संजय तायडे पुढील तपास करीत आहेत. संशयितांपैकी १४ आरोपींना अटक केली आहे.आठवडेबाजार मुशायरा कार्यक्रम रद्दरविवारी साकळीचा आठवडेबाजार असतो. महिनाभरापासून साकळीच्या ऐतिहासिक हजरत सजनशाह वली बाबा उर्स सुरू आहे. त्यांच्या नावे पाच आठवडे बाजार भरवले जातात. आठवडे बाजाराच्या दिवशी परीसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात दर्ग्यावर दर्शनार्थ येत असतात. आजचा चौथा बाजार होता. मात्र हा आठवडेबाजार रद्द झाला आहे. तसेच प्रजासत्तासक दिनानिमित्ताने साकळीकरांनी रविवारी ‘एक श्याम--शहीदो के नाम ’’ हा मुशायरा व कविसंमेलनाचे आयोजित केले जाते. हा कार्यक्रमसुद्धा या घटनेने रद्द झाला आहे.दोन दिवसांपासून दुकाने बंदया घटनेने शनिवारपासून गावातील सर्व व्यावसायिक दुकाने बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे.गावात पोलीस बंदोबस्त तैनातपोलीस उपअअधीक्षक राजेंद्र रायसिंंग, पो.नि. डी.के. परदेशी हे ठाण मांडून आहे. शीघ्र कृती दल, राखीव पोलीस दल, यावल, चोपडा, रावेर, सावदा, फैजपूर, निंभोरा, जळगाव, भुसावळ येथील पोलीस बंदोबस्तास तैनात असल्याने गावात सर्वत्र पोलीसच नजरेत पडत आहेत.
यावल तालुक्यातील साकळी येथे तणावपूर्ण शांतता, गावात बंदोबस्त कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 4:52 PM
ग्रामपंचायत कार्यालयाचे नाव उर्दूत टाकावे या मागणीसह टिपू सुलतान व डॉ.अब्दुल कलाम यांचे कार्यालयात छायाचित्र लावण्याच्या मागणीवर ग्रा.पं.च्या काही सदस्यांनी विरोध केल्याच्या कारणावरून तालुक्यातील साकळी येथे प्रजासत्ताक दिनी झालेल्या वादावरून दोन गटात दंगल झाली. दंगलीत दोन्ही गटांकडून एकमेकावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय, खासगी वाहनावर व रहिवाशांंच्या घरावर दगडफेक केली.
ठळक मुद्देग्राम पंचायत कार्यालयात छायाचित्र लावण्यावरून झाला वादप्रजासत्ताक दिनी दोन गटात उसळली होती दंगलजमावाकडून खासगी वाहन, घरांवर दगडफेकदगडफेकीत महिला जखमीदंगलप्रकरणी ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखलपोलिसांकडून १४ जणांना अटकदोन दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प