जळगाव : प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या विभागीय आयुक्तांनी फटकारल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद पडलेल्या आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पासाठी मनपा प्रशासनाने तडकाफडकी घनकचरा प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. ‘प्रदूषण’चे विभागीय आयुक्त आर.जी.कुळकर्णी दोन दिवसांपासून शहरात आले असून, त्यांनी शुक्रवारी घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली असता कुठल्याही प्रक्रियेविना पडलेल्या कचऱ्याबाबत नाराजी व्यक्त करत मनपा आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांची देखील चांगलीच झाडाझडती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आव्हाणे शिवारातील मनपाचा घनकचरा प्रकल्प २०१२ पासून बंद असून, शहरातून दररोज जमा होणारा २२० टन कचरा या ठिकाणी टाकला जात आहे.सहा वर्षात या ठिकाणी १ लाख मेट्रीक टन हून अधिक कचरा जमा झाला असून, त्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे रासायनिक प्रक्रियेमुळे आग लागून विषारी धुर संपुर्ण परिसरात पसरत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिकांकडून वेळोवेळी निवेदन देवून देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नव्हती.दौºयाचा पार्श्वभूमीवर केली घाईमहाराष्टÑ राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय आयुक्त कुलकर्णी हे गुरुवारपासून शहरात दाखल झाले. त्यांनी अधिकाºयांकडून घनकचरा प्रकल्पा बाबत आढावा घेतला़त्यांच्या दौºयाचाच पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी १२ कोटी रुपयांची निविदा काढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रकल्प कार्यान्वित करण्यासह बंद पडलेल्या प्रकल्पात पडलेल्या १ लाख टन मॅट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी देखील मनपाने ४ कोटी रुपयांची निविदा घाईत काढलेली दिसून येत आहे.शासनाकडून अनुदान रोखले जाण्याची होती भितीमनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वर्षभरातच देखील डीपीआरची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शासनाकडून मनपाला स्वच्छतेसाठी मिळणारे अनुदान देखील रोखले जाण्याची शक्यता होती. विभागीय आयुक्तांसमोर मनपाचे पितळ उघडे पडू नये म्हणूनच दोनच दिवसात ही निविदा काढण्यात आली आहे.३१ मार्चपर्यंतची होती डेडलाईनघनकचरा प्रकल्पाअंतर्गत मार्च २०१८ मध्ये मंजूर झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या डिपीआरच्या रक्कमेतून घनकचरा प्रकल्पासाठीची प्रक्रिया पुर्ण करण्याच्या मनपा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच हा निधी खर्च न झाल्यास अनुदान रोखण्याचाही इशारा शासनाकडून देण्यात आला होता. मात्र, मनपाने ३१ मार्च पुर्वी केवळ वाहन खरेदीसाठीच ७ कोटी रुपये खर्च केले होते. आता दोन महिन्यांनंतर १२ कोटी रुपयांची घनकचरा प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. यासाठी मनपाकडून आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे.विलगीकरण होत नसल्याने व्यक्त केली नाराजीशुक्रवारी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कुलकर्णी, आयुक्त डॉ.उदय टेकाळे,आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यासह अधिकाºयांनी आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पाहणी केली. या ठिकाणी पडलेल्या कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने विभागीय आयुक्तांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. शहरात ओला व सुका कचºयाचे विलगीकरण होत नसल्याने देखील त्यांनी आरोग्य अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. तसेच तत्काळ पडलेल्या कचºयावर प्रक्रिया करण्याचा सूचना दिल्या असून, मनपाच्या ढिसाळ कारभारावर देखील विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
प्रदूषण महामंडळाच्या आयुक्तांनी फटकारल्यानंतर मनपाने काढली घनकचरा प्रकल्पाची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:34 PM