जळगाव : अतिवृष्टीमुळे शेतीचे उत्पन्न हातातून निसटले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आई वडिलांची होत असलेली दमछाक तसेच शिकवणीच्या शुल्कासाठी पैशाची जुळवाजुळव करताना पित्याची दमछाक पाहता यामिनी प्रमोद पाटील (१७) या बारावीच्या विद्यार्थिनीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी भादली, ता. जळगाव येथे घडली. दरम्यान, यामिनी ही दहावीला टॉपर होती.प्रमोद पाटील हे शेती व्यवसायक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यावर्षी चांगला पाऊस असल्याने उत्पन्नही चांगले येईल, असे वाटत असताना पाऊस इतका जास्त होईल व त्यात सर्व काही उद्ध्वस्त होऊ असे वाटले नव्हते. अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे कुटुंबाची जबाबदारी उचलताना पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.कन्या यामिनी ही शहरातील महाविद्यालयात बारावी सायन्सचे शिक्षण घेत होती. मुलगा लोकेश हा नशिराबाद येथे आयटीआयचे शिक्षण घेत आहे.
कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दहावीत टॉपर विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:42 AM