शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

भीषण अपघात, दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:10 PM

खोटेनगरजवळील घटना : एका ट्रक चालकाचा मृत्यू; अडकलेल्या चालकाला काढण्यास लागला तब्बल अर्धा तास

जळगाव : जळगावहून धुळ्याकडे निघालेला भरधाव ट्रक समोरून येणाऱ्या कांद्याच्या ट्रकवर धडकल्याने धुळ््याकडे जाणाºया ट्रकचा चालक ठार झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील खोटे नगरजवळील एका हॉटेल समोर झाला. प्रल्हाद पितांबर पाटील (४५, रा़ निंबेल, ता़ जि़नंदुरबार) असे मयताचे नाव आहे़अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही ट्रक धडकताचं काही अंतरापर्यंत जोरदार आवाज झाला़ आवाज कसला असावा, म्हणून अनेकांनी महामार्गावर धाव घेवून घटनास्थळी गर्दी केली होती़ त्यातच धडक देणाºया ट्रकचा पुढील भागाचा चुराडा झाला होता तर त्यात चालक अडकलेला असल्यामुळे त्यास तब्बल अर्ध्यातासानंतर बाहेर काढण्यास नागरिकांना यश आले़प्रल्हाद पाटील हे ट्रकमध्ये (क्रमांक एमएच़१८, बीजी़२९१४) बिस्कीट भरून धुळ्याच्या दिशेने जात होते़ दुसरीकडे नाशिक येथून ट्रकमध्ये (क्रमांक़ सीजे़०४,जेडी़५७०९) कांदे भरून अनिलकुमार गुप्ता हा चालक नाशिककडून पश्चिम बंगालमधील सिलीगुडीच्या दिशेने निघाला़ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चालक गुप्ता हा खोटेनगर जवळील हॉटेल राधिकासमोरील महामार्गावरून जात होता़ त्यावेळी समोरून भरधाव येत असलेला प्रल्हाद पाटील यांचा ट्रक हा गुप्ता यांच्या ट्रकवर धडकला़कांद्याने भरलेल्या ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला़ त्यात चालक प्रल्हाद पाटील अडकले़ त्यामुळे चालक गंभीर जखमी असून त्याला वेळेवर उपचार मिळावे म्हणून नागरिकांनी त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ तब्बल अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर गंभीर जखमी चालक प्रल्हाद पाटील यांना बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले़ परंतु, त्यांचा त्यावेळी मृत्यू झाला़समोरून भरधाव येत असलेल्या ट्रक आपल्या ट्रकवर धडकणार, म्हणून स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी चालक अनिल गुप्ता याने ट्रक काही अंतरापर्यंत वळविला़ परंतु, त्यातच अपघात झाला़ दरम्यान, या अपघातात अनिल गुप्ता व त्यांच्यासोबत असलेल्या क्लिनर यास कुठलीही दुखापत झालेली नाही़महामार्गावर वाहतूक ठप्पमहामार्गाच्या मधोमध अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती़ अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे, एपीआय गणेश चव्हाण, वासुदेव मराठे, महेंद्र सोनवणे, राजेश पाटील, अशोक पाटील, सतिष हाळनोर, विजय दुसाने यांच्यासह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजुला करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव