जळगाव : शहरात आयोजित राज्यस्तरीय बांबू कार्यशाळेकडे राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी पाठ फिरविली. एवढेच नव्हे तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा जळगावात असताना देखील ते सुद्धा फिरकले नाही, त्यामुळे राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.राज्य बांबू विकास मंडळ, नागपूर व इंडियन फेडरेशन फॉर ग्रीन एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात राज्यस्तरीय बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यभरातील शेतकरी ताटकळलेदुपारी ४ वाजता कार्यशाळेचा समारोप होता. यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती. व्यासपीठावर एम.के. अण्णा पाटील, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्यासह काही अधिकारी वर्ग होता. वन मंत्री दहा मिनिटात येणार असल्याचे शेतकºयांना आयोजकांकडून वारंवार सांगण्यात येत होते.५ वाजता कार्यक्रमस्थळी फोन आला व मंत्री मुनगंटीवार हे भुसावळ येथून येथे जळगाव विमानतळावर गेल्याचे सांगण्यात आले. त्यांनी यावे म्हणून बांबू मिशनचे कार्यकारी समिती सदस्य माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील यांनी प्रयत्न केले मात्र त्यांनाही यश आले नाही. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे येणे अपेक्षित होते. मात्र यापैकी एकाही मंत्र्याने कार्यक्रमस्थळी साधी भेटही दिली नाही. चंद्रकांत पाटील यांच्या दौºयात मात्र या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार नव्हते. मुनगंटीवर हे राळेगणसिद्धीला जाणार असल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात ते नागपूरला रवाना झाल्याची माहिती मिळाली.उत्पन्न वाढीसाठी सात कलमी योजनाराज्यातील शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयाचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट कसे होईल यासाठी सात कलमी योजना तयार केली आहे. त्याची ज्योत या फैजपूर पावनभूमीत देशातील पहिल्या अटल महाकृषी कार्यशाळेच्या माध्यमातून पेटविण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून आयोजित अटल महाकृषी कार्यशाळा येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जळगाव येथे बांबू शेती कार्यशाळेकडे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 1:12 PM
शेतकरी ताटकळले
ठळक मुद्देपालकमंत्री, जलसंपदा मंत्री, सहकार राज्यमंत्रीही ‘दांडी’उत्पन्न वाढीसाठी सात कलमी योजना