शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

बड्या नेत्यांची जळगाव जिल्ह्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:58 AM

कॉँग्रेसतर्फे झाली केवळ एक सभा

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्हयात यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद वगळता केंद्रीय नेत्यांच्या सभा झाल्याच नाहीत. मात्र जे नेते आले त्यांच्या सभा गाजल्या. जळगाव व रावेर मतदार संघ मिळून जिल्ह्यात विविध पक्षांच्या एकूण १७ नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे वातावरणही तापल्याची स्थिती होती.जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्चला अधिसूचना जाहीर झाली. ८ एप्रिलला लढती स्पष्ट झाल्या. जळगावसाठी १४ तर रावेरसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. जळगावसाठी भाजपने आमदार उन्मेष पाटील, राष्टÑवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर, रावेरसाठी भाजपने खासदार रक्षा खडसे तर कॉँग्रेसने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या त्या पक्षाच्या स्टार प्रचारकांनी सभा घेतली.केवळ दोन केंद्रीय नेत्यांची सभाराष्टÑवादी कॉँग्रेसने एरंडोल येथे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची एक सभा झाली तर भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भुसावळ येथे केवळ एक सभा झाली. अन्य कोणीही राष्टÑीय पातळीवरील नेते जिल्ह्यात फिरकले नाहीत.कॉँग्रेसची एक सभाजिल्ह्यात कॉँग्रेसतर्फे पक्षाच्या नेत्यांपैकी केवळ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची एक सभा मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा येथे झाली. पक्षातर्फे या व्यतीरिक्त अन्य नेता जिल्ह्यात आला नाही.मुख्यमंत्र्यांनी घेतल्या सभामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावेर, अमळनेर व जळगाव येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. अमळनेर येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावरील हाणामारीमुळे ‘डॅमेज कंट्रोल’साठी एक सभा घेण्यात आली. तर जळगाव शहराचे मतदान हे निवडणुकीवर परिणामकारक ठरत असल्याने येथे वातावरण निर्मितीसाठी त्यांची सभा झाली. या व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शिंदाड ता. पाचोरा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जळगाव व चोपडा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नगरदेवळा ता. पाचोरा, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, जिल्हा प्रभारी सरोज पांडे, महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक यांनी शहरात मेळावा व बैठक घेतली. गिरीश महाजन यांनीही मेळावे व सभा घेतल्या.राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे आले राज्यातील नेतेराष्टÑवादी कॉँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा जिल्ह्णात आले. पहिल्या दौºयात त्यांनी आघाडीच्या नेत्यांचा मेळावा घेतला. यानंतरच्या दौºयात त्यांनी चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, जळगाव शहरातील मेहरूण भागात सभा घेतली.माजी मंत्री छगन भुजबळ यांनी कोळगाव ता. भडगाव, फौजिया खान यांनी नशिराबाद, जळगाव शहरात, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शहरात कॉर्नर सभा घेतल्या. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चाळीसगाव येथे सभा घेतली.अशी होती सभांची वैशिष्टयेजिल्ह्णात बºयाच सभा दुपारच्या वेळी भर उन्हात झाल्या. तरीही समर्थक नागरिकांनी सभांना उपस्थिती दिली. यावेळी खेड्यात झालेल्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण यु ट्युब चॅनलद्वारे प्रसारीत केले गेले. राजकीय पक्षांनी त्याचे नियोजन केले होते.जातीय समिकरणानुसार सभामतदारांचे एकगठ्ठा मतदान व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन बहुतांश सभा झाल्या. मराठा, वंजारी, मुस्लिम यासह विविध समाजांना आपल्याकडे वळविण्याचा राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सभांच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचे दिसून आले.सभांमुळे वातावरण निर्मितीत भर पडली. पक्षाच्या नेत्यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या सभांमुळे मोठ्या प्रमाणात मत परिवर्तन करण्यात यश आले. - अ‍ॅड. रवींद्र पाटील,जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी कॉँग्रेसपक्षातर्फे केवळ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली. सभांऐवजी आम्ही मतदारांच्या संपर्कावर भर दिला. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवले. -अ‍ॅड. संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस

टॅग्स :Jalgaonजळगाव