जळगाव : अहमदनगर जिल्ह्यात बनावट दारुमुळे अनेक जणांचा बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक विभागात बनावट दारुविरुध्द कारवाईची मोहीम उघडली आहे. जळगावच्या पथकाने शनिवारी भोईटी, ता.शिरपुर येथे धाड टाकून १० लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचे बनावट विदेशी मद्य ब्लेड स्पिरिटचे २०० लीटर मापाचे एकूण २३ बॅरल जप्त केले.गेल्या काही महिन्यात जळगावच्याच पथकाने बनावट देशी व विदेशी दारु निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले होते व विदर्भात जाणारी दारुही पकडली होती. याचे मुख्य सूत्रधार शिरपूर परिसरातच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी ही जबाबदारी जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या पथकावर सोपविली होती. विभागीय निरीक्षक सी.पी.निकम यांच्या नेतृत्वाखाली विशेष भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सी.एच. पाटील, डी एल.जगताप, खोडे, एल.व्ही.पाटील, जी.बी. इंगळे एम.पी पवार, सहायक दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान भूषण वाणी, एस.एस. निकम, वाय.आर. जोशी, जंजाळे, नंदु नन्नवरे, योगेश राठोड, नंदु पवार, गोकुळ कंखरे, राहुल सोनवणे, अजय गावंडे, भुषण, मुकेश पाटील आदींनी ही कारवाई केली.मालक मात्र फरारपथकाने धाड टाकली तेव्हा घटनास्थळावर कोणीही नव्हते. त्यामुळे मालक हाती लागला नाही. दारुसाठी हा साठा परिपक्व झाला होता. पथक एक दिवस उशिरा पोहचले असते तर कदाचित या रसायनाची दारु तयार होवून ती विक्रीसाठी बाजारात पोहचली असती.
बनावट दारुचे रसायन जप्त
By admin | Published: February 26, 2017 12:10 AM