कुंदन पाटील
जळगाव : नात्यातल्या नात्यात लग्न केल्यावर गर्भधारणावस्थेत नेमक्या चाचण्या न केल्यामुळे राज्यात १३ हजारांवर ‘थॅलेसेमिया’ग्रस्त नवजात जन्माला आली आहेत. या नवजातांना नियमित रक्तपुरवठा करावा लागत असल्याने रक्त साठ्यावर संकट आले आहे. त्यातील ११ हजार ५५३ नवजातांसाठी शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.
एक नाडी किंवा एकाच जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या ‘थॅलेसेमिया’ग्रस्त बाळांची संख्या जास्त असते.
दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी
वंशपरंपरेने व आनुवांशिकतेने जनुकांद्वारे दाम्पत्याकडून शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होतात. त्यांचे पुढच्या पिढीत वहन होते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत एक जनुक आई वा वडिलांकडून अपत्यात शिरते, तर अनेकदा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येते. परिणामी, बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते. थॅलेसेमिया ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा गंभीर (मेजर) स्वरूपात असतो.
गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात
गर्भधारणा राहिल्यावर १० आठवड्यांच्या कालावधीत पोटातल्या बाळाची रक्तचाचणी करून निदान करता येते. गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात करता येतो. त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे. - डॉ. गौरव महाजन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव.
मोफत रक्त घेणारे थॅलेसेमिया रुग्ण
मुंबई ३१८१ पुणे १३१२ नागपूर ५७२ छ. संभाजीनगर ५३६ ठाणे ५०६ जळगाव ४३७ नांदेड ४२६ अहमदनगर ४१६ सांगली ३९०
अकोला ३१५ अमरावती ३११ सोलापूर २४४ कोल्हापूर २२७ यवतमाळ २१९ जालना २११ धुळे २०२ सातारा १८७ बीड १७२
परभणी १६६ बुलढाणा १५८ चंद्रपूर १५१ भंडारा १४९ लातूर १३९ वर्धा ११७ वाशिम ७५ हिंगोली ५१ रायगड ३९ नंदुरबार ३२ सिंधुदुर्ग २८ रत्नागिरी २६ धाराशिव २६ गोंदिया ११ गडचिरोली ०३ पालघर १
एकुण ११५५३ एवढ्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करावा लागत आहे.