मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पाशर््वभूमीवर सुरक्षितता म्हणून येथील पोलीस ठाण्यातील ‘ठाणे अंमलदार टेबल’ थेट पोलीस ठाण्याबाहेर लावून कामकाम करण्यात येत आहे.कोविड योद्धा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावणाºया पोलिसांना सुरक्षितता उपाययोजना तोकड्या आहेत. अशात त्यातही गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. कोरोना संकटा पाठोपाठ उन्हाच्या दाहकतेत सेवा बजावत आहेत. राज्यात कोरोना योद्धा म्हणवून काम करणाºया पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली तर जिल्ह्यात पाचोरा येथे वरिष्ठ अधिकाºयांला कोणतेही लक्षण नसताना कोविड तपासणी पॉझिटिव्ह आली. अशा अवस्थेत पोलिसांचे मनोबल उंचविणे महत्वाचे म्हणावे लागेल. याकरिता सुरक्षिततेवर भर देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कर्मचाºयांना सतत आवाहन करीत आहेत.अशात पोलीस ठाण्यात येणाºया नागरिकांचा संपर्क ठाणे अंमलदाराच्या टेबलापर्यंत मर्यादित राहावा. जेणे करून पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या टेबलावर सेवा देणाºया कर्मचाºयांचा थेट नागरिकांशी येणार थेट संपर्क टाळला जाऊन सुरक्षा निर्माण होईल. म्हणून ठाणे अंमलदार टेबल पोलीस स्टेशन बाहेर भिंतीला लागून असलेल्या तहसीलदार कार्यालयातील बाह्य भागात पोर्च वजा ओसरीत लावण्यात आला आहे.आता नागरिक तक्रारी व अन्य कामासाठी अगोदर या ठाणे अंमलदार टेबलावर संपर्क साधत असल्याने थेट पोलीस स्टेशनच्या आत काम करणाºया कर्मचाºयांना सुरक्षितता मिळाली आहे.
ठाणे अंमलदार टेबल पोलीस ठाण्याबाहेर लावून काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 2:58 PM
पोलीस ठाण्यातील ‘ठाणे अंमलदार टेबल’ थेट पोलीस ठाण्याबाहेर लावून कामकाम करण्यात येत आहे.
ठळक मुद्देसुरक्षिततता म्हणून कामकाज इतर कर्मचाऱ्यांचा संपर्क टाळला जावा