आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : एमआयडीसीत अनेक कंपन्याच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून अवैध प्रकारे देशी, विदेशी व गावठी दारु सर्रासपणे विक्री केली जात आहे. या व्यावसायिकांनी हिरवी नेटची जाळी लावून ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करुन दिली आहे. पोलिसांनी जणू आपल्याला अधिकृत परवानाच दिला आहे, या अविर्भात या व्यायसायिकांचे वागणे आहे. एकंदरीत या अवैध दारु विक्रीमुळे हाणामा-या, चो-या, लूटमार यासारख्या घटनांना खतपाणी मिळत आहे, त्यामुळे उद्योजक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीतील अवैध धंद्याबाबत ‘लोकमत’ ने वेळोवेळी आवाज उठविला आहे. मंगळवारी दुपारी व सायंकाळी ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता अनेक ठिकाणी खुलेआमपणे दारु विक्री केली जात असल्याचे दिसून आले. या विक्रेत्यांना कोणाचाच धाक नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. खेडी परिसरात तर महामार्गाला लागूनच हिरवी जाळी लावून अवैध दारु विक्री केली जात होती. तेथून थोड्याच अंतरावर पेट्रोल पंपाच्या समोर एका लॉजच्या बाजुलाच काही ग्राहक दारु प्यायला बसले होते. सायंकाळी ७ ते रात्री २ पर्यंत भरते जत्रा एमआयडीसीच्या एम व एन या दोन सेक्टरमध्ये सायंकाळी ७ ते रात्री २ वाजेपर्यंत मद्यपींची अक्षरश: जत्रा भरलेली असते. एक विक्रेता सायंकाळी सात वाजता देशी व गावठी दारु घेऊन येतो. विक्रीच्या ठिकाणी पाणी पाऊच व चखन्याची व्यवस्था केली जाते. एका ठिकाणी बियरशॉपच्या नावाखाली सर्वच प्रकारची दारु तेथे विकली जात होती. म्हाडा कॉलनीला लागून नाल्याकाठी देखील बिनधास्तपणे गावठी दारु विक्री केली जात होती. राजकीय आश्रयाच्या गुन्हेगारांना हप्ता भारत पेट्रोलियम, साई नगर, सरकारी गोदाम या भागात हिरव्या नेट लावून आतमध्ये दारु विक्री केली जात होती. तर एका ठिकाणी ढाब्यावर तर प्रत्येक प्रकारची दारु व बियर मिळत होती. हा ढाबा चालक राजकीय आश्रय असलेल्या गुन्हेगारांना दर महिन्याला हप्ता देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांपेक्षा तीन पट हप्ता या गुन्हेगारांना मिळतो. सहा महिन्यापूर्वी एका परिविक्षाधीन पोलीस अधिकाºयाने या ढाब्यावर धाड टाकली होती.
जळगाव एमआयडीसीत थाटले अवैध दारुचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:47 PM
एमआयडीसीत अनेक कंपन्याच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून अवैध प्रकारे देशी, विदेशी व गावठी दारु सर्रासपणे विक्री केली जात आहे. या व्यावसायिकांनी हिरवी नेटची जाळी लावून ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करुन दिली आहे. या अवैध दारु विक्रीमुळे हाणामा-या, चो-या, लूटमार यासारख्या घटनांना खतपाणी मिळत आहे, त्यामुळे उद्योजक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देउद्योजक झाले त्रस्त चो-या व लुटमारीच्या घटना वाढल्यापोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष