चाळीसगाव : : हौसेला मोल नाही, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय चाळीसगावमधील रांजणगाव येथील तरुणीच्या विवाह सोहळ्यात आला. गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील वराने लग्नानंतर वधुला थेट हेलिकॉप्टरने आपल्या गावी नेले. यामुळे या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा आहे.
रांजणगाव येथील प्रगतशील शेतकरी संतोष भीमसिंग परदेशी यांची कन्या तसेच विकास सोसायटीचे माजी चेअरमन भिकन रामचंद्र परदेशी यांची नात प्रिया हिचा विवाह सोहळा कोदगाव चौफुली भागात पार पडला. गंगापूर येथील व्यावसायिक देविसिंग ठाकूर यांचे पुत्र चेतन ठाकूर यांच्यासोबत हा विवाह सोहळा थाटात पार पडला. गावाच्यावतीने या नवदाम्पत्याचा सत्कार सरपंच प्रमोद चव्हाण तसेच माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील यांच्यासह रावण वा, उपसरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य शालीक मोरे, नजीरपठाण, भिकन परदेशी, वधुपिता संतोष परदेशी, कैलास परदेशी, बाबुसिंग ठाकूर, विजय परदेशी या सर्वांच्या हस्ते करण्यात आला.
गावात पहिल्यांदाच!
लग्न आटोपल्यानंतर दुपारी ३:०० वाजता नवरदेवाने चक्क हेलिकॉप्टरमधून नववधूला आपल्या गावाला गंगापूर, ता. संभाजीनगर येथे नेले. गावात प्रथमच असा एक अनोखा सोहळा पार पडला. यावेळी समस्त रांजणगावकर आपल्या गावाच्या मुलीला सोडायला हेलिपॅडवर उपस्थित होते.