शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

आयुष्याचे वाळवंट 40 वृक्षांच्या हिरवळीने केले दूर, कॅन्सरशी लढत जगवली वृक्षराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 8:55 AM

अन्नदेखील गिळता येत नाही, अशा  कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत कासोदा, ता. एरंडोल  येथील गोरख महादू मराठे (५०) यांनी सार्वजनिक विद्यालयात तब्बल ४० झाडे जगवली आहेत. 

- प्रमोद पाटीलकासोदा (जि. जळगाव)  - अन्नदेखील गिळता येत नाही, अशा  कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत कासोदा, ता. एरंडोल  येथील गोरख महादू मराठे (५०) यांनी सार्वजनिक विद्यालयात तब्बल ४० झाडे जगवली आहेत. 

गोरख मराठे हे शाळेत नाईक पदावर कार्यरत आहेत. त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि पायाखालची जमीनच जणू हादरली; पण हार मानायची नाही, असा त्यांनी निश्चय केला.  त्यांनी कॅन्सरशीच लढा सुरू केला. आपले मन कुठे तरी रमावे,  म्हणून वृक्षवल्लीला त्यांनी आपले सोयरे बनवण्याचे ठरवले. 

गोरख पाटील हे विद्यालयात नाईक या पदावर काम करतात;  गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत.  त्याला अन्न गिळता येत नाही, अशा परिस्थितीत त्यांनी वृक्ष जगवून विद्यार्थी आणि आम्हालाही सावली दिली आहे.  - नरेंद्र पाटील, माजी मुख्याध्यापक, सार्वजनिक विद्यालय, कासोदा. 

रोपांची झाली झाडे- सन २०१६-१७ मध्ये गोरख मराठे यांनी या शाळेत ४० रोपे लावली.  शाळेशेजारी नाला वाहतो, गावातील गटारींचे पाणी या नाल्यात येते. या नाल्यातून वाहणारे  पाणी उन्हाळ्यात या रोपांना देण्याचे काम गोरख इमानेइतबारे करीत राहिले.- नाला आटल्यावर आजूबाजूच्या हातपंपातून पाणी आणून रोपांना टाकले, नंतर या शाळेने आवारात बोअर केला, तेथे पाणी लागले. या शाळेतील बोअरचे पाणी देणे सोपे झाले. आजही सर्व रोपं वृक्ष होत आहेत. सावली तर देत आहेतच शिवाय शाळेचे  आवार निसर्गरम्य व हिरवेगार दिसू लागले आहे. सोबत कॅन्सरशीही लढा सुरूच आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य