शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘महसुली’ कारवाईची ‘खबर’ फुटली, संशयितांच्या मोबाईलची निघतेय ‘कुंडली’!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 7:06 PM

फिरस्ती पथकांवर ‘वॉच’ ठेवणाऱ्या पहारेदारांच्या ५ दुचाकी जप्त 

कुंदन पाटीलजळगाव : महसुल आणि पोलिसांच्या संयुक्त ४ पथकांनी जिल्ह्यात साध्या वाहनाद्वारे गस्त सुरु केली. मात्र गस्त घालणाऱ्या वाहनांमागे पहारेकऱ्यांच्या दुचाकी दिसताच या पथकांनी ‘यु टर्न’ घेत या म्होरक्यांचा पाठलाग सुरु केला. या पळवापळवीत ५ दुचाकी हाती लागल्या आहेत. साध्या वाहनात गेल्यावरही वाळूमाफियांना फिरस्ती पथकाविषयी माहिती मिळाली कुठून, याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आता प्रत्येक संशयितांच्या मोबाईलमधून ‘कुंडली’ बाहेर काढण्यात व्यस्त झाले आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सोमवारी रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत वाळूमाफियांचा शोध घेण्यासाठी चार पथकांना सज्ज केले. त्यात परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, ४ सशस्त्र व ६ साध्या वेशातील पोलिसांना पाचारण करण्यात आले. या पथकांवर अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी गस्त घालण्यासाठी चौफेर जबाबदारी दिली. त्यानुसार एक पथक चोपडा, दुसरे तापीकाठी, तिसरे गिरणाकाठी आणि चौथे पथक सातपुड्याच्यादिशेने रवाना झाले. मात्र चारही पथकांचा वाळूमाफियांचे पहारेकऱ्यांनी दुचाकीने पाठलाग सुरु केला. ही बाब पथकांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने ‘यु-टर्न’ घेतला.

पाठलाग सुरु केल्यावर पाच जणांनी दुचाकी सोडून पळ काढला. या दुचाकी ताब्यात घेत या पथकांनी थेट मध्यप्रदेशाची सीमा गाठली. पहाटे सहा वाजता भेटी दिलेल्या ‘स्पॉट’वरुन जिल्हाधिकाऱ्यांना ‘सेल्फी’ काढून पाठविली. तेव्हा कारवाईची ‘खबर’ कुणीतरी फोडल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यानुसार संशयितांच्या मोबाईलची ‘कुंडली’ काढली जात आहे.

टॅग्स :sandवाळू