कुंदन पाटील
जळगाव : ‘लम्पी’ने जिल्हाभर पाय पसरविले असताना उपाययोजना म्हणून आठवडे बाजार बंद केले.लसीकरण मोहिमही पार पाडली. मात्र तरीही पशुधनांच्या बळींच्या संख्येचे ३०० चा आकडा पार केल्याने शेतकऱ्यांमध्ये दाराशी चिंतेचे ढग जमले आहेत.
गेल्यावर्षी ‘लम्पी’मुळे जामनेर, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्याला मोठा फटका बसला होता. यंदा मात्र एकट्या चाळीसगाव तालुक्यात १५० जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन चाळीसगावच्या दिमतीला धावले आहे. मात्र ऐन हंगामात पशुधनाची गरज पडत असल्याने शेतकरीही प्रशासनाच्या आवाहनाला दाद द्यायला तयार नाही. त्यामुळे निव्वळ दुर्लक्षपणामुळे जनावरांचे बळी जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
९१९ जनावरे बाधीत
२५ सप्टेंबर अखरेपर्यंत जिल्ह्यात ९१९ जनावरे लम्पीमुळे बाधीत झाले आहेत. त्यात पाचोरा तालुक्यात २०७, अमळनेरला ४१, एरंडोल १२८, चाळीसगाव १८९, भडगावमध्ये १४२ जनावरे बाधीत आहेत.रावेर व धरणगावमध्ये अनुक्रमे ६० व ४८ जनावरे बाधीत आहेत. धरणगाव तालुक्यात आतापर्यंत ४८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
चार तालुक्यात बळी नाही
बोदवड, मुक्ताईनगर, चोपडा, यावल तालुक्यात सुदैवाने एकाही पशुधनाचा बळी गेलेला नाही. या चार तालुक्यांपैकी यावल, मुक्ताईनगर व भुसावळमध्ये सस्यस्थितीला एकही जनावर बाधीत नाही.
४ हजारांवर बाधीत
लम्पीचा प्रादुर्भावानंतर जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ४१ जनावरे बाधीत झाली आहेत. त्यातील २७९७ जनावरे बरी झाली आहेत.तर ३०५ जनावरांचा बळी गेला आहे.
तालुकानिहाय पशुधनांचे बळी
जळगाव-०२पाचोरा-३७अमळनेर-१४यावल-००एरंडोल-२६भुसावळ-००चाळीसगाव-१५७जामनेर-०२भडगाव-३१चोपडा-०७रावेर-००धरणगाव-०९पारोळा-२०मुक्ताईनगर-००बोदवड-००शेतकऱ्यांनी काळजी घेणे, हाच महत्त्वाचा विषय आहे. मात्र हंगामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून नाईलाजास्तव दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे तरी गोठा स्वच्छसह उपचारासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन करतो.
-डॉ.शामकांत पाटील, उपायुक्त,पशुसंवर्धन विभाग.