कुंदन पाटील
जळगाव : लोकसभेसाठी सोमवारी मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे. सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेदरम्यान, या चार तासात सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापाठोपाठ जालना व रावेरने आघाडी घेतली आहे.शिरुर मात्र पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार, रावेर, जळगाव, शिरुर, अहमदनगर, जालना, छ.संभाजीनगर, पुणे, मावळ, बीड आणि शिर्डी मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या चार तासात मतदानाचा टक्का नंदुरबारमध्ये सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉ.हीना गावीत आणि कॉंग्रेसच्या ॲड.गोविल पाडवी यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे नंदुरबारची लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
पहिल्या चार तासातील मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार - २२.१२ टक्केजळगाव- १६.८९ टक्केरावेर - १९.०३ टक्केजालना - २१.३५ टक्केऔरंगाबाद - १९.५३ टक्केमावळ -१४.८७ टक्केपुणे - १६.१६ टक्केशिरूर- १४.५१ टक्केअहमदनगर- १४.७४ टक्केशिर्डी -१८.९१ टक्केबीड - १६.६२ टक्के