कुंदन पाटील, जळगाव: ‘लम्पी’ आजारामुळे मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ११६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ५१७ बाधीत जनावरांवर उपचार सुरु असून मंगळवारी लसीकरणही १०० टक्के पूर्ण झाले आहे.गेल्यावर्षी जामनेर तालुक्यात ‘लम्पी’ची सर्वाधिक बाधा झाली होती. यावर्षी मात्र चाळीसगावपासून ‘लम्पी’ने पाय पसरावयला सुरुवात केली. त्यामुळे आतापर्यंत १५८३ जनावरांना ‘लम्पी’ची लागण झाली. त्यातील ९४५ जनावरांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीला ५१७ जनावरे बाधीत आहेत. तर आतापर्यंत ११६ जनावरांचा बळी गेला आहे. त्यात सर्वाधिक बळी चाळीसगाव तालुक्यात गेले आहेत. जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यातील जनावरांवर ‘लम्पी’ने आक्रमण केले आहे.
तालुकानिहाय बाधीत जनावरे व मृत्यू संख्या
- धरणगाव-२४-०१
- पारोळा-५२-११
- जळगाव-०८-०१
- एरंडोल-७१-०९
- पाचोरा-१०३-११
- चोपडा-०४-००
- चाळीसगाव-१७०-७३
- भडगाव-२९-०७
- अमळनेर-५०-०२
- जामनेर-०३-०१