- वासुदेव सरोदेलाेकमत न्यूज नेटवर्कफैजपूर (जि. जळगाव) : हात किंवा पायाला एक-दोन बोटे अधिक असल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र न्हावी (ता.यावल) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क २६ बाेटे असलेले बाळ जन्माला आले आहे. डॉक्टरांकडूनही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मध्य प्रदेशातील झिरण्या (जि. खरगोन) येथील दाम्पत्य नंदू आणि ज्योती बारेला या दाेघांचे हे बाळ आहे.
ज्याेती यांना २० मे रोजी प्रसूतीसाठी न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांनी सामान्य प्रसूतीमध्ये एका मुलाला जन्म दिला. माणसाला सामान्यत: हात आणि पायाचे मिळून २० बाेटं असतात. काही प्रकरणात २१ तर कधी २२ बाेटं असल्याचे समाेर आले; पण २६ बाेटं असण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. माता व बाळ दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळले यांनी सांगितले.
बालरोगतज्ज्ञ म्हणतात.. nआतापर्यंत २१, २२ ते २४ बोटांचे बाळ जन्माला आले आहेत. n२६ बोटांचे बाळ जन्माला येणे, वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना. nडॉ. राजेश चौधरी यांच्या मते, यामागे ठोस कारण नाही.nसहा महिने ते एक वर्षापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करता येईल.
अधिकची सहा बोटे नवजात बाळाच्या दाेन्ही हाताला एक-एक तर दाेन्ही पायाला दाेन-दाेन अधिकची बोटे आहेत.