शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

‘इएसआयसी’ रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित, केंद्रीय प्रशासनाकडे जाणार प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 6:00 PM

वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या या रुग्णालयासाठी जागेअभावी अडचण निर्माण झाली होती.

- कुंदन पाटील

जळगाव :  कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्यावतीने (इएसआयसी) येथे १०० खाटांचा सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यासाठी एमआयडीसीतील खुला भूखंड-३ या जागेला ५ सदस्यीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे ५ एकर क्षेत्रात ही इमारती उभी राहणार आहे. त्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या केंद्रीय प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या या रुग्णालयासाठी जागेअभावी अडचण निर्माण झाली होती. तशातच एमआयडीसीने सुरुवातीला जागा देण्यास नकारही दिला होता. तेव्हा खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा केला आणि एमआयडीसीच्या ताब्यातील जमीन या रुग्णालयाच्या इमारतीसाठी उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार ५ जागांची पाहणी करण्यात आली होती.

भूखंड-३ ला संमतीरविवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे विभागीय संचालक ए.के.साहू, राज्य वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय कांबळे, कार्यकारी अभियंता अश्वीनकुमार, सहायक संचालक संदीपकुमार, सदस्य डॉ.सुहास फालक, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, तहसीलदार नामदेव पाटील, शाखा प्रबंधक चंदन नारखेडे, लिपीक मयूर बाविस्कर यांनी एमआयडीसीतील जागेची पाहणी केली. या प्रशस्त जागेतून पाच एकर जागा या रुग्णालयासाठी वर्ग करण्यासाठी समितीने मान्यता दिली.

केंद्राकडे प्रस्ताव जाणारदरम्यान, राज्य समितीचा अहवाल केंद्रीय प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. त्याठिकाणी मंजूरी मिळाल्यावर एमआयडीसीला जागा हस्तांतरित करण्याच्या सूचना त्यांच्या विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यापोटी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खुला भूखंड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या जागेवर असलेल्या झाडांना मूळासकट सुरक्षितपणे बाहेर काढून अन्यत्र त्यांचे रोपण करण्यात येईल. तसेच विद्युत पोलही हलविण्यात येणार आहे. एमआयडीला खुला भूखंड उपलब्धही करुन देण्यात येईल.कामगारांच्या आरोग्यासाठी सुविधायुक्त रुग्णालय उभे राहावे, हाच प्रशासनाचा प्रयत्न आहे.-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव