नाट्य क्षेत्रआणि स्त्रिया ....नाटकामधली फार जुनी आणि नेहमीची समस्या म्हणजेच नाटकात काम करण्यासाठी मुली पुढे येत नाही आणि मला असं वाटतं की, या समस्या न सुटणाऱ्या आहेत, जोपर्यंत स्त्रियांचाच नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा बदलत नाही. कारण नाटक ही एक कला आहे जोपर्यंत हे स्त्रीवर्ग समजणार नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही, आणि महत्त्वाचे म्हणजेच स्त्रियांनी येणे का महत्त्वाच आहे किंवा त्यांनी का या क्षेत्राकडे का यावे? तर माझा अनुभव असा की कोणतीही कला असो ती माणसांना प्रगत करण्यास मदत करते, आणि मला माझा एक स्त्री म्हणून जो शोध लागला असेल तर तो नाटक या क्षेत्रामुळेच आणि कुठलही क्षेत्र असले म्हणजेच महिलांना समस्या असतातच. कारण कुटुंब सांभाळून आपण छंद जोपासणं हे थोड कठीण होत, पण आपले छंद जोपासत काम केलं तर आपल्यालाच प्रगत होण्यास मदत होईल, म्हणून सर्वप्रथम महिलांनी नाटक या माध्यमाकडे आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, आणि जेव्हा हे होईल तेव्हा नाटक आणि स्त्रिया या वेगळ्या नसून दोघांना प्रगत होण्यास मदत होईल.-मोना तडवी, नाटयक्षेत्र. , जळगाव
नाट्य क्षेत्र आणि स्त्रिया ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:23 PM