जळगावचे नाव सांस्कृतिक गाव व्हावे, या उद्देशाने अनेक सांस्कृतिक संस्था, रंगकर्मी आणि कलाकारांचे प्रयत्न सुरू आहेतच़ शासनाकडून मात्र प्रतिसाद नाही़ महाराष्ट्रात प्रत्येक गावात किंवा तालुक्याच्या स्थळी शासनाचा हॉल अथवा नाट्यगृह चांगल्या स्थितीत आहे़ मग जळगाव येथील बालगंधर्व नाट्यगृह याला अपवाद का? येथे आज अतिक्रमण विभागाचेच अतिक्रमण दिसते़ रंगमंच व समोरील परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे़ लग्नसमारंभ व बिगर सांस्कृतिक कार्यक्रमांना दिल्यामुळे स्टेज, मेकअप रूमची दुर्दशा झालेली आहे़ बरेचशे बांधकाम पडीत अवस्थेत आहे़ सामाजिक संस्थांना़ विशिष्ट काळासाठी जर ही जागा दिली तर चांगले थिएटर उभे राहिल किंवा वरिष्ठ रंगकर्मींची समिती बनवून त्यांच्या सूचनेनुसार या जागेची निखा राखली जाऊ शकते़ जागेचा इतर कलांच्या सरावासाठी व प्रदर्शनासाठीही उपयोग होऊ शकतो़ त्याचे उदाहरण म्हणजे महात्मा गांधी उद्यान किंवा भाऊंचे उद्याऩ छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह़ खूपच खर्च करून मुंबई-पुण्याच्या धर्तीवर बांधले गेले , मात्र त्याचे भाडे सामान्यांना परवडणारे नाही़ बांधकाम चालू असताना नामवंत संस्था, तंत्रज्ञ, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, ज्येष्ठ रंगकर्मींना मार्गदर्शनासाठी कधीच बोलावले नाही़ हे नाट्यगृह मनपाच्या अखत्यारित हवे, या नाट्यगृहात कोणताही प्रयोग सादर करण्याची कोणी हिम्मत करणार नाही, ही परिस्थिती कायम न राहता, दोनही सुसज्ज नाट्यगृहात दर्जेदार कार्यक्रम पाहायला मिळतील हीच भाबडी आशा सर्व रंगकर्मी बाळगून आहेत.-पियुष़ सी़ रावळ, रंगकर्मी
सुसज्ज नाट्यगृहांची रंगकर्मींना आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:36 PM