१८ रोजी झालेल्या चोरीला तीन दिवस पूर्ण होत नाही, तोपर्यंत २२ रोजी पहाटेपर्यंत पुन्हा दुसरी लाखो रुपये किमतीच्या साहित्याची चोरी उघडकीस आली. कंपनीचे मालक प्रवीण निकम हे २१ च्या रात्री साहित्याची चोरी झाली त्याबाबत अडावद तालुका चोपडा येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. जवळपास चार दिवसांच्या अंतरात वीस लाख रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली आहे.
माचला गाव ते कंपनी यातील अंतर केवळ दीड किलोमीटर आहे. तरीही एवढे अवजड साहित्य वाहनात टाकून चोरट्यांनी चोरून नेले आहे. म्हणून चोरट्यांनी कंपनी परिसराचा पुरेपूर अभ्यास करूनच साहित्य पळविले आहे.
राज्याचे सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचे लहान भाऊ प्रवीण निकम यांच्या मालकीची ही कंपनी आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.