जळगाव- जुने जळगावामधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांचे चांदीचे मुकूट व कुंडले चोरट्यांनी भरदिवसा लांबविल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ मंदिरातील पुजारी समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेले असता अवघ्या पाच मिनिटात चोरट्याने चोरी केली.गेल्या १५ दिवसांपासून शहरात चोºया व घरफोड्यांचे सत्र सुरु आहे. दररोज शहरात किमान एक चोरी अथवा घरफोडीची घटना घडत असून चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.जुने जळगावात विठ्ठल-रूख्मिणी यांची मूर्ती असलेले पुरातन मंदिर आहे़ या ठिकाणी अनेक वर्षांपासून रथ चौकातील राजेंद्र जोशी हे पुजारी आहेत़ नेहमीप्रमाणे जोशी हे मंदिरात आरतीसाठी आले दुपारी १ वाजता आरती आटोपल्यानंतर गाभाºयाच्या दरवाज्याला कडी लावून मंदिराबाहेर समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात पुजेसाठी गेले़ तेवढ्यात अज्ञात चोरट्याने विठ्ठल व रुख्मिणी यांच्या डोक्यावरील चांदीचे मुकूट तसेच कुंडलेही चोरून नेले़ पाच मिनिटांनी जोशी पूजा आटोपून मंदिरात आल्यावर त्यांना गाभाºयाचा दरवाजा उघडा दिसला़ अन् चांदीचे मुकूट व कुंडलेही चोरीला गेल्याचे दिसून आले़ त्यांनी त्वरित शेजारी असलेले डॉ़ विश्वनाथ खडके यांना बोलवून मुकूट चोरीला गेल्याची माहिती दिली़ डॉ.खडके यांनी शनिपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली़
जुने जळगावातील विठ्ठल मंदिरातून मुकुटांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 9:22 PM
जुने जळगावामधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांचे चांदीचे मुकूट व कुंडले चोरट्यांनी भरदिवसा लांबविल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़
ठळक मुद्देजुने जळगावातील भरदुपारची घटनामहादेवच्या मंदिरात पुजेसाठी गेले अन् चोरट्यांनी संधी साधलीजळगाव शहरात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरुच