ठळक मुद्दे३१ हजार रुपयांचा पोषण आहार चोरी८ ते १० सप्टेंबर दरम्यानची घटनाभडगाव पोलिसात गुन्हा दाखल
भडगाव : भडगाव तालुक्यात कनाशी येथील चक्रधर माध्यमिक विद्यालयातून ३१ हजार ३०० रुपये किंमतीच्या शालेय पोषण आहाराची चोरी झाल्याप्रकरणी भडगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कानाशी येथील चक्रधर माध्यमिक विदयालय शाळेतील खोलीतून ८ ते १० सप्टेंबर दरम्यान १० वाजेच्या दरम्यान शाळेत ठेवलेल्या तांदूळ, मटकी, हरभरा, वाटाणे , मिरे, मोहरी, हळद, मिरची , सोयाबीन तेल इत्यादी शालेय पोषण आहारातील साहित्य खोलीचे कुलूप तोडून चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक देवीदास माणिक मोरे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात अज्ञात व्यक्तिविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे या . घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे हे करीत आहेत