शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

स्वत:च्याच कंपनीत केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:55 PM

फिल्ड अधिकाऱ्याने केली १२ लाखांची चोरी, सहा जणांना अटक

जळगाव : बोदवड येथील नम्र फायनान्स लिमिटेड कंपनीत १२ लाख ८ हजार रूपयांचा ऐवजावर डल्ला मारणाºया टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. सहा जणांना अटक करण्यात आली आहे़ यात कंपनीतीलच फिल्ड अधिकारी सुनील इंगळे याने साथीदारांच्या मदतीने ही चोरी घडवून आणल्याचे उघड झाले आहे़ व्यवस्थापक मनोज धर्मराज माळी हा या चोरीतील मास्टरमार्इंंड आहे. त्यानेच या घटनेबाबत फिर्याद दिली आहे.स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरिक्षक बापू रोहोम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली़स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नम्र फायनान्स कंपनीतील चोरीप्रकरणी फिल्ड अधिकारी सुनील कडू इंगळे (रा़ निमखेडी बु, ता़ मुक्ताईनगर), त्याचे साथीदार किसन उर्फ शेंड्या कैलास सोनवणे, विलास मधूकर पवार, प्रवीण सुखा धुलकर उर्फ लहाण्या, गणेश सोपान पवार, प्रदीप किशोर सोनवणे (सर्व रा़ बोदवड) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.अशी घडली घटनाबोदवड शहरातील जामठी रस्त्यावर नम्र फायनान्स लिमिटेड ही कंपनी आहे़ १३ आॅक्टोबर रोजी कंपनीत अमोल मोरे हा कर्मचारी झोपलेला होता़ त्यावेळी कंपनीचा दरवाजा बंद करण्यास अमोल यास विसर पडला़ हीच संधी साधत मध्यरात्री सहा चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करीत कपाटातील १२ लाख ८ हजार २५२ रूपयांचा ऐवज लंपास केला़ तत्पूर्वी या भामट्यांनी जवळच असलेल्या किराणा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडले़ हा प्रकार १४ आॅक्टोबरला उघड झाल्यानंतर कंपनीतील व्यवस्थापक मनोज धर्मराज माळी यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़कुणी घेतली दुचाकी तर कुणी मोबाईलचोरीतील संशयितांनी पैशांची समान वाटणी करीत चांगलीच दिवाळी साजरी केली़यामध्ये एकाने महागडी दुचाकी तर दुसरयाने मोबाईल विकत घेतला़ काहींनी स्वत:वर असलेले कर्जाची फेड केली तर कुणी उधारीचे पैसे दिले असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे़दुचाकी, मोबाईल हस्तगतस्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून अटक करण्यात आलेल्या सहाही संशयितांकडून दुचाकी, ७० हजार रूपये रोख, एक मोबाईल असा १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे़ही कारवाई पोलीस निरिक्षक बापु रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील पोलीस उपनिरिक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, गफुर तडवी, दीपक पाटील, रणजित जाधव, इंद्रीस पठाण, अशोक पाटील, मुरलीधर बारी, शरद भालेराव, संदीप सावळ, वहीदा तडवी, वैशाली महाजन आदींनी केली आहे़ या चोरट्यांचा मुक्ताईनगर, बोदवड, बुलढाणा, मलकापूर आदी ठिकाणीही शोध घेण्यात आला होता़