खानापूर येथील अटवाडे रस्त्यावरील श्रीराम मंदिर संस्थांनच्या बर्डीलगत असलेल्या स्मशानभूमीतील ओट्यांवरील लोखंडी अँगलची चोरी दोन जण करत होते. १ हजार १४५ रुपये किमतीची ही जाळी लंपास करताना नरेंद्र सुपडू बोदडे व ईश्वर राजाराम बोदडे रा. फकीरवाडा, आठवडे बाजार परिसर, रावेर हे आढळून आले. या दोन्ही आरोपींना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून रावेर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना ५ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ग्रा.पं. सदस्य शेख रशीद शेख रफिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध व त्यांच्या अल्पवयीन साथीदाराविरुध्द भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र जैन पुढील तपास करीत आहेत.
स्मशानभूमीत लोखंडाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:20 AM